Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळसाठी आश्वासक चेहरा, चेअरमनपदाच्या कालावधीत दाखविली धडाडीभाजपची पुण्यातून घोषणा, एकनाथ शिंदे दिल्लीत - शिवसेनेकडून मंगेश चिवटेंना एबी फॉर्म ! मंगळवारी भैया मानेंचे अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन ! !जयंत आसगावकरांसाठी सतेज पाटील, विश्वजीत कदम मैदानात ! पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंग !!ट्युमरच्या रुग्णांना वरदान – सिद्धगिरी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण !कौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांनी भरला उमेदवारी अर्ज ! मंत्री, आमदारांसह पदाधिकाऱ्यांच उपस्थिती !!शिवसेनेचा अधिकृत AB फॉर्म..पदवीधर - शिक्षक  मतदारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टीखंडेराव जगदाळेंचा शिक्षक मतदारसंघातून अर्जजज डददजज डड

जाहिरात

 

गोकुळसाठी आश्वासक चेहरा, चेअरमनपदाच्या कालावधीत दाखविली धडाडी

schedule06 Oct 26 person by visibility 11 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांशी निगडीत संस्था म्हणजे गोकुळ. संपूर्ण जिल्हयाची जणू आर्थिकवाहिनी. दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना सक्षम व महिलांना स्वावलंबी बनविणारा हा संघ. संचालक, प्रशासकीय व व्यवस्थापन वर्ग, कर्मचारी असे विविध घटक सोबत जोडलेले. यामध्ये संचालकांच्या कार्यकारिणीला महत्व. शेतकरीभिमुख धोरणे आखायची आणि प्रशासनाकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी करुन घ्यायची ही जबाबदारी संचालकांच्या कार्यकारिणीवर. यामध्ये सर्वाधिक मोठी भूमिका चेअरमनांची. विद्यमान चेअरमन नविद मुश्रीफ यांनी अल्पावधीतच कामाची धडाडी दाखवित गोकुळसाठी आश्वासक चेहरा असल्याचे सिद्ध केले आहे.

 महायुती आणि महाविकास आघाडीतील संघर्षाच्या राजकारणातून त्यांच्या गळयात चेअरमनपदाची माळ पडली. प्रारंभी, चेअरमन कोणाचा महायुतीचा की महाविकास आघाडीचा असा प्रश्न चर्चिला गेला. त्यावर ‘हम सब एक है’हे त्यांचे वाक्य सर्वसमावेशक राजकारणाचे द्योतक ठरले. कारण गोकुळमध्ये सर्वपक्षीय संचालक. चेअरमनपदाची घडामोड घडण्याअगोदर भाजप सोडून सगळे पक्ष सत्तेत. आणि त्यांच्या चेअरमनपद निवडीनंतर महायुतीचा चेअरमन म्हणून भाजपही सत्तेत. चेअरमनपदाच्या निवडीनंतर त्यांनी दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य दिले. नेतेमंडळी, गोकुळमधील ज्येष्ठ संचालकांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास सुरुवात केली. विविध ठिकाणी भेटी दिल्या. दूध उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. दूध संकलन वाढ आणि विक्री…त्यामाध्यमातून शेतकऱ्यांच्या हातात चार जादा पैसे हे सूत्र गोकुळचे.

चेअरमन मुश्रीफ यांनी कामकाज करताना ते सूत्र कायम ठेवले. मंत्री हसन मुश्रीफ यांचे ते चिरंजीव. प्रारंभी तीच ओळख ठळक होती. मात्र नविद मुश्रीफ यांनी आपल्या कामकाजातून, साऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याच्या वृत्तीने, प्रश्न समजावून घेत त्याच्या सोडवणुकीसाठी काम करण्याची पद्धत यामुळे स्वतंत्र ओळख घडविली आहे. आता गोकुळच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. महायुतीविरुद्ध काँग्रेस प्रणित समविचारी आघाडी अशी थेट लढत दिसत आहे. निवडणुकीच्या प्रचारार्थ संचालक तालुकानिहाय दौरे करत आहेत. या संपर्क दौऱ्यात विद्यमान चेअरमन आघाडीवर आहेत. गेल्या पाच वर्षातील कामगिरी् मांडत आहेत. चेअरमन म्हणून जो कालावधी मिळाला त्या कालावधीतील काम लोकांना सांगत आहेत. महायुतीच्या संचालकासोबत रोज एका भागाचा दौरा सुरू आहे. दूध उत्पादकांनाही हा तरुण चेहरा आपला वाटत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes