Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उलट्या दिशेच्या वातावरणास महात्मा फुले यांचे विचारच सरळ करतील  - विचारवंत प्रा. डॉ. शरद जावडेकरबोंद्रेनगरच्या मातीत घुमला आदिवासी एकतेचा तारपाशिष्यवृत्ती परीक्षेचा जिल्हा परिषद शाळांचा झेंडा !  जरगनगर विद्यामंदिर, महाराष्ट्र हायस्कूलचे विद्यार्थी राज्यात द्वितीयस्थानी ! !संस्कार विद्यालयात नशामुक्त - स्वस्थ भारत अभियानाचा जागरप्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या शतकमहोत्सवी विशेष लोगोचे रविवारी अनावरणगोकुळ दूध संघाची निवडणूक ६० दिवसात घ्या; मुदत वाढीसाठी पुन्हा येवू नका कार डीलर्स आंदोलनाच्या पावित्र्यात, गुरुवारी ठोकणार आरटीओ कार्यालयाला टाळेराजेश क्षीरसागरांच्या भाषणाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली, हद्दवाढीसह विकास प्रकल्पांना मिळणार चालना लिंगायत समाजाचा कोल्हापुरात एल्गार ! आमदार शिवाजी पाटलांची मध्यस्थी, मुख्यमंत्र्यांच्यासोबत मंगळवारी मंत्रालयात बैठक ! !कोल्हापूरवर आमचे विशेष प्रेम, शहराच्या विकासासाठी हद्दवाढ गरजेचे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

उलट्या दिशेच्या वातावरणास महात्मा फुले यांचे विचारच सरळ करतील  - विचारवंत प्रा. डॉ. शरद जावडेकर

schedule10 Aug 26 person by visibility 7 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  :  ‘ राज्याचेच नव्हे तर देशाचे वातावरण सध्या उलट्या दिशेने चालले आहे या वातावरणात सद्यस्थितीत महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचारच सरळ करतील एवढी ताकद त्यांच्या विचारात आहे .’अशी स्पष्टोक्ती  विचारवंत आणि अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ . शरद जावडेकर यांनी दिली.

 भारतीय शिक्षण मंडळ आणि अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्ष सोहळ्यानिमित्त आयोजित कोरगांवकर हायस्कूल येथील कार्यशाळेत महात्मा फुले यांच्या विचारांची कालसापेक्षता या विषयावरती प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय शिक्षण हक्क सभेचे अध्यक्ष प्रा .रमेश पाटील होते. जावडेकर म्हणाले, ‘महात्मा फुले केवळ शिक्षणतज्ञ नव्हते तर शैक्षणिक अर्थशास्त्रज्ञ आणि कृषितज्ञ होते तसेच ते सामाजिक नाटककार होते. ते भारताचे मार्टिन ल्युथर किंग आणि गौतम बुद्धानंतर तार्किक विचार मांडणारे द्रष्टे चिकित्सक होते. कार्ल मार्क्स आणि महात्मा फुले यांच्या विचारात अनेक बाबतीत साधर्म्य असले तरी महात्मा फुले यांचे विचार सत्यशोधकी आणि क्रांतिकारी होते. डॉ. जावडेकर यांनी महात्मा फुले यांच्या साहित्य, कृषि, शिक्षण, अर्थकारण या सर्व बाबींवर प्रकाशझोत टाकला. शिक्षणावर प्रेम असणाऱ्या आणि संघटना म्हणून पुढे असणाऱ्या कोणत्याही शिक्षक संघटनेने प्रथमदर्शी जंतरमंतर वरील जेन झी ला पाठिंबा दिला नव्हता याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

सचिव भरत अलगौडर यांनी प्रास्ताविक केले. माजी सचिव एम . एस. पाटोळे आणि प्राथमिक विभागाच्या सचिव संध्या वाणी यांच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. इंद्रायणी पाटील यांच्या गीतमंच विभागाने आणि पर्यवेक्षिका सरिता शिंदे यांनी गायलेल्या प्रार्थनेने कार्यशाळेस सुरुवात झाली . तृप्ती रावराणे यांनी सूत्रसंचालन केले . संध्या वाणी यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी संचालक हसन देसाई, नेहा कानकेकर, राष्ट्रसेवादल संघटक हणमंत देसाई, उर्मिला पोवार,मुख्याध्यापक संजय सौंदलगे, सुरेखा पोवार, रणधीर मिरजकर, रंगराव कांदळकर, मारुती शिणगारे, राजाराम संकपाळ उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes