Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरवर आमचे विशेष प्रेम, शहराच्या विकासासाठी हद्दवाढ गरजेचे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसठठ डदशहीद शिक्षण परिवाराने दिले स्वप्नांना बळ, डोंगराळ भागातील मुलांनी केली यूपीएससी परीक्षा सरअभाविपतर्फे गुणवंत विद्यार्थी छात्र सोहळा उत्साहातसीपीआरमध्ये विनाछेद यशस्वी हृदयशस्त्रक्रिया लिंगायत समाजाचे रविवारी धरणे आंदोलन, मुख्यमंत्र्यांना देणार निवेदनमुख्यमंत्री महोदय !  विद्रूपीकरणाचे उद्घाटन करू नका, मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदन ! ! सर्वपक्षीय शोकसभेत दादांच्या आठवणींना उजाळा !  महापौर म्हणाल्या, साऱ्यांनी मिळून डी.वाय. पाटील यांचे स्मारक साकारू ! !गोकुळतर्फे दूध खरेदी- विक्री दरात वाढजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय शिंदे

जाहिरात

 

कोल्हापूरवर आमचे विशेष प्रेम, शहराच्या विकासासाठी हद्दवाढ गरजेचे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

schedule09 Aug 26 person by visibility 90 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ' कोल्हापूरवर आमचं विशेष प्रेम आहे. कोल्हापूर शहराने महायुतीला भरभरून दिले आहे. या शहराला यापूर्वीही काही कमी पडू दिले नाही यापुढेही काही कमी पडू देणार नाही मात्र विकासासाठी शहराची हद्दवाढ गरजेचे आहे. मी लोकप्रतिनिधींना आश्वासित करतो की हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या गावांच्या सगळ्या सुविधा पूर्ण करू . कोल्हापूर शहराच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या पूर्ण करू ." अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.   संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे लोकार्पण, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचा लोकार्पण सोहळा, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या घरकुलाचे लोकार्पण आणि रंकाळा येथील संगीत कारंजा लोकार्पण सोहळा अशा विविध विकास कामांसाठी मुख्यमंत्री फडणवीस रविवारी कोल्हापूर दौरा आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये 1850 कोटीच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा झाला. विविध विकासकामांचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये प्रायव्हेट हायस्कूल येथील मैदानावर कार्यक्रम झाला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोक माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार जयश्री जाधव,  महापौर रुपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर,  सभागृह नेते मुरलीधर जाधव, सभापती कौसर बागवान, विजय खाडे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संगीतसूर्य केशवराव  नाट्यगृह नूतनीकरण, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय इमारतीचे नूतनीकरण केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच पूर नियंत्रणासाठी राज्य सरकारने कृतिशील प्रकल्प आखला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुराचे पाणी दुष्काळी भाग व मराठवाडापर्यंत पोहोचवता येईल. पूर्ण नियंत्रण प्रकल्पाच्या त्या कामालाही सुरुवात होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूरवर आमचे विशेष प्रेम आहे. कोल्हापूरने आम्हाला भरभरून दिले आहे. कोल्हापूरला यापूर्वीही काही कमी पडू दिले नाही यापुढेही काही कमी पडू देणार नाही. कोल्हापुरात भव्य क्रिकेटचे मैदान प्रस्तावित आहे तसेच कन्व्हेन्शन सेंटरला ही मंजुरी दिली आहे कोल्हापूर हे कुस्ती, कलाक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या फुटबॉलला चालना  देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोल्हापूरच्या विकासासाठी हद्दवाढ गरजेचे आहे . मी 100 टक्के अडचणी सोडवतो. मी लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो की, हद्दवाढ झालीच पाहिजे. कोल्हापूरने आम्हाला भरभरून दिले आहे आम्ही त्यांच्यासाठी  काही करू शकलो नाही तर आमच्यासारखे करंटे दुसरे कोणीच असणार नाही असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आयुक्त राजेंद्र भारूड यांनी आभार मानले. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजर्षी शाहू समाधीस्थळाचे दर्शन घेतले. तर प्रायव्हेट हायस्कूल येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध विकास कामासंबंधीच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes