Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उलट्या दिशेच्या वातावरणास महात्मा फुले यांचे विचारच सरळ करतील  - विचारवंत प्रा. डॉ. शरद जावडेकरबोंद्रेनगरच्या मातीत घुमला आदिवासी एकतेचा तारपाशिष्यवृत्ती परीक्षेचा जिल्हा परिषद शाळांचा झेंडा !  जरगनगर विद्यामंदिर, महाराष्ट्र हायस्कूलचे विद्यार्थी राज्यात द्वितीयस्थानी ! !संस्कार विद्यालयात नशामुक्त - स्वस्थ भारत अभियानाचा जागरप्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या शतकमहोत्सवी विशेष लोगोचे रविवारी अनावरणगोकुळ दूध संघाची निवडणूक ६० दिवसात घ्या; मुदत वाढीसाठी पुन्हा येवू नका कार डीलर्स आंदोलनाच्या पावित्र्यात, गुरुवारी ठोकणार आरटीओ कार्यालयाला टाळेराजेश क्षीरसागरांच्या भाषणाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली, हद्दवाढीसह विकास प्रकल्पांना मिळणार चालना लिंगायत समाजाचा कोल्हापुरात एल्गार ! आमदार शिवाजी पाटलांची मध्यस्थी, मुख्यमंत्र्यांच्यासोबत मंगळवारी मंत्रालयात बैठक ! !कोल्हापूरवर आमचे विशेष प्रेम, शहराच्या विकासासाठी हद्दवाढ गरजेचे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

शिष्यवृत्ती परीक्षेचा जिल्हा परिषद शाळांचा झेंडा !  जरगनगर विद्यामंदिर, महाराष्ट्र हायस्कूलचे विद्यार्थी राज्यात द्वितीयस्थानी ! !

schedule10 Aug 26 person by visibility 49 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे एप्रिल २०२६ मध्ये घेतलेल्या प्राथमिक इयत्ता चौथी व उच्च प्राथमिक इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी, दहा ऑगस्ट २०२६ जाहीर करण्यात आला. इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा निकालात कोल्हापूर जिल्ह्यात भुदरगड तालुका अव्वलस्थानी आहे.कागल तालुका द्वितीय क्रमांकावर तर राधानगरी तालुका तृतीय क्रमांकावर आहे. दरम्यान सातवीच्या शिष्यवृती परीक्षेत शहरी विभागात महाराष्ट्र हायस्कूलचा विद्यार्थी समर्थ श्रीकांत पाटील व महापालिकेच्या जरग विद्यामंदिरमधील मृणाली सचिन जाधव यांनी प्रत्येकी  २९० गुण प्राप्त करत राज्य गुणवत्ता यादीत दुसऱ्या स्थानी आहेत.  चौथीच्या शिष्यृवृत्ती परीक्षेत शहरी विभागात श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरातील विद्यार्थी शिवम बलराम गुरवने २९० गुण प्राप्त करत राज्य गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक पटकाविला. चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत ग्रामीण विभागात चंदगड तालुक्यातील विद्यामंदिर गौळवाडीमधील आदर्श अजित ओऊळकरने २९२ गुण प्राप्त करत तृतीय क्रमांक पटकाविला. तर सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागात कागल तालुक्यातील विद्या मंदिर आणूरमधील विद्यार्थी आराध्या संजय दंडवते व करवीर तालुक्यातील कन्या विद्या मंदिर वडणगे येथील देवकी अजित काटकर यांनी प्रत्येकी २८४ गुण मिळवत राज्य गुणवत्ता यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत.

चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ४१.२७ टक्के तर सातवी शिष्यवृत्ती परीक्षेतील टक्केवारी ३७.९९ टक्के इतकी आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, उपाध्यक्ष तानाजी पाटील, शिक्षण समिती सभापती शितल प्रवीण यादव यांनी केले आहे. कोल्हापूर जिल्हयाच्या निकालाची टक्केवारी राज्यापेक्षा अधिक आहे. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ग्रामीण विभागात कोल्हापूर जिल्ह्यातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या २४ इतकी आहे. याच परीक्षेत शहरी विभागात जिल्ह्यातील ३३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागातंर्गत २५ तर शहरी विभागातील १३ विद्यार्थी राज्यस्तरीय यादीत शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. दरम्यान चौथीच्या परीक्षेत ग्रामीण विभागातंर्गत राज्य गुणवत्ता यादीतील २४ पैकी २३ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेतील आहेत. सातवीच्या राज्य गुणवत्ता यादीमध्ये जिल्ह्यातील २५ पैकी १६ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेतील आहेत.

चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागात राज्य गुणवत्ता यादीत राधानगरी तालुक्यातील कन्या विद्या मंदिर कसबा वाळवे येथील आराध्या नितीन कोरे, चंदगड तालुक्यातील विद्या मंदिर बोंजुर्डे येथील शिवम अर्जुन पाटील, विद्या मंदिर तावरेवाडी येथील शरयू व्यंकटराव कागणकर व भुदरगड तालुक्यातील केंद्र शाळा कूर येथील स्वरा संदीप उगले यांनी प्रत्येकी २८६ गुण घेत सहाव्यास्थानी आहेत. चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागात राज्य गुणवत्ता यादीमध्ये महापालिकेच्या प्रिन्स शिवाजी विद्या मंदिर जाधववाड येथील हर्षवर्धन मुकेश पुनाळकरने २८८ गुण घेत तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.  प्रिन्स शिवाजी विद्या मंदिर जाधववाडी येथील शिवराज महिपती चव्हाण व बॅरिस्टर नाथ पै विद्यालय गडहिंग्लज येथील अविनाश सागर कुंभार यांनी प्रत्येकी २८४ गुण घेत पाचव्या स्थानी आहेत.

सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागातंर्गत राज्य गुणवत्ता यादीमध्ये भुदरगड तालुक्यातील श्री. प बा पाटील हायस्कूल मुदाळ येथील यशिता अजित पाटील, आजरा तालुक्यातील विद्या मंदिर बेलेवाडी येथील काव्या विठठल डांगले व भुदरगड तालुक्यातील विद्या मंदिर पळशिवणे येथील वेदांत संदीप चौगले यांनी प्रत्येकी २८२ गुण मिळवत पाचव्या स्थानावर आहेत.सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागात राज्य गुणवत्ता यादीमध्ये श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर येथील अर्णव शिवप्रसाद ढोणे हा २८८ गुणासह चौथ्या स्थानावर आहे. इचलकरंजीतील छत्रपती राजर्षी शाहू  हायस्कूलमधील अथर्व दीपक ढोणे व  गडहिंग्लज येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील सम्यक संजय ठोकळे यांनी प्रत्येकी २८६ गुण मिळवत पाचवा क्रमांक पटकाविला.

 

 

 

…………………………………

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes