Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात यावे : डॉ. सुनीलकुमार लवटे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेतर्फे दिवंगत सभासदाच्या वारसांना अर्थसहाय्य थकीत घरफाळा वसुलीसाठी महापालिकेची कडक पावले !  मिळकतधारकांवर सक्त कारवाई, कर्मचाऱ्यांचे पगार थांबणार !!हवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची शिवाजी विद्यापीठातून पीएचडीठठ ददरंगकर्मींचे भर पावसात आंदोलन, खाजगीकरणाच्या विरोधात बरसल्या घोषणाउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेनेतर्फे वृक्षारोपणशाळेची पटसंख्या वाढली, विभागीयस्तरावर क्रमांक ! मंत्र्यांकडून मुख्याध्यापक- शिक्षकांना शाबासकी ! !जिल्हा नियोजनचा २९२ कोटीचा निधी , आमदार -मंत्र्यांची नको भागिदारी ! शंभर टक्के निधी हवा जिप सदस्यांना, सर्वपक्षीय सदस्यांची सह्यांची मोहीम ! ! जिल्हा परिषद सदस्यांना समाधानकारक निधी देणार - मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

शाळेची पटसंख्या वाढली, विभागीयस्तरावर क्रमांक ! मंत्र्यांकडून मुख्याध्यापक- शिक्षकांना शाबासकी ! !

schedule27 Jul 26 person by visibility 332 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : काही वर्षापूर्वी शाळेची पटसंख्या दोन अंकीकेवळ ३५ विद्यार्थी शाळेत. मात्र मुख्याध्यापक व शिक्षकांनी संकल्प केला. पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करायचे. शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात घेतलं. गावकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेचे महत्व पटवून दिलं. त्यांनीही साथ दिली. शैक्षणिक उपक्रमावर भर दिला. फलस्वरुप म्हणजे, शाळेच्या पटसंख्येचा आलेख उंचावत गेला. आज त्या शाळेत तब्बल १२०० हून अधिक विद्यार्थी शिकतात. विशेष म्हणजे, ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा अभियान’मध्ये या शाळेने विभागीयस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. राज्यस्तरीय मूल्याकंनासाठी शाळा पात्र ठरलीय. ही किमया घडली आहे, ‘पीएमश्री कुमार विद्या मंदिर ३ कुरुंदवाड.’या शाळेत.  या चमकदार शैक्षणिक कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेतर्फे त्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचा सोमवारी (२७ जुलै २०२६)विशेष सन्मान झाला.

 वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक रविकुमार पाटील, शिक्षक शंकर दिवटे, विकास पोवार, शिवाजी शिंदे, बाबासाहेब प्रदाने यांचा सत्कार करण्यात आला. मानचिन्ह देऊन गौरविले. जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात हा कार्यक्रम झाला. माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, शिक्षण समिती सभापती शितल यादव, समाजकल्याण समिती सभापती श्रध्दा गायकवाड, महिला व बालकल्याण समिती सभापती विद्या विलास पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ यांनी मुख्याध्यापक पाटील व अन्य शिक्षकांच अभिनंदन केले. शाळेची पटसंख्या ३५ वरुन १२०० पर्यंत पोहोचली आहे असे सांगताच मंत्री मुश्रीफ यांनी,‘छान, साऱ्यांचे अभिनंदन’अशा शब्दांत शाबासकीची थाप दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes