Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रंगकर्मींचे भर पावसात आंदोलन, खाजगीकरणाच्या विरोधात बरसल्या घोषणाउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेनेतर्फे वृक्षारोपणशाळेची पटसंख्या वाढली, विभागीयस्तरावर क्रमांक ! मंत्र्यांकडून मुख्याध्यापक- शिक्षकांना शाबासकी ! !जिल्हा नियोजनचा २९२ कोटीचा निधी , आमदार -मंत्र्यांची नको भागिदारी ! शंभर टक्के निधी हवा जिप सदस्यांना, सर्वपक्षीय सदस्यांची सह्यांची मोहीम ! ! जिल्हा परिषद सदस्यांना समाधानकारक निधी देणार - मंत्री हसन मुश्रीफशिक्षण विभागाच्या कारभाराची दबक्या आवाजात चर्चा व्हायला नको : मंत्री मुश्रीफांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना सूचनाविद्यार्थिनींच्या सहभागातून पर्यावरण संरक्षणाची चळवळ उभारू या : डॉ. जगन्नाथ पाटील खासगीकरणाला रंगकर्मींचा विरोध, मंगळवारी नाट्यगृहासमोर धरणे आंदोलनसंमेलन शाहू कार्य संवर्धनाचे !  निर्धार शाहू विचारांची ‘झेन झी’पिढी घडविण्याचे ! !जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या तज्ञसंचालकपदी  स्वप्निल घस्ते

जाहिरात

 

रंगकर्मींचे भर पावसात आंदोलन, खाजगीकरणाच्या विरोधात बरसल्या घोषणा

schedule28 Jul 26 person by visibility 38 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह खाजगीकरणाच्या विरोधात मंगळवारी रंगकर्म मोठ्या संख्येने स्त्यावर उतरले. नाट्यगृहासमोरच भर पावसात त्यांनी आंदोलन करत खाजगीकरणाला विरोध केला. खाजगीकरणाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. 

रंगकर्मी सुनील घोरपडे, अभिनेता  सागर तळाशीकर, आनंद काळे, अभिनेता स्वप्नील राजशेखर, कला शिक्षक सागर बगाडे, प्रसाद जमदग्नी, धनंजय पाटील, दिनेश माळी, किरणसिंह चव्हाण, रोहन घोरपडे, युवराज घोरपडे, सुनील माने, राजश्री खटावकर, सर्जेराव पाटील, सचिन मोरे, अमर मोरे, भालचंद्र काळे यश शिंदे श्रेयस सोनार प्रा.  ए जी जोशी,  सतीश स्वामी, संग्राम भालकर, पद्माकर कापसे , धनंजय पाटील, संजय हळदीकर नरहर कुलकर्णी, किरणसिंह चव्हाण, उमेश पोवार, अमित अडसुळे, पंडित कंदले, शाहीर दिलीप सावंत आदींचा समावेश होता . 'संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे खाजगीकरण थांबवा,  मी, छत्रपती शाहू राजांचा वारसा- मला दुसऱ्यांच्या घरी बांधू नका' अशा आशयचे फलक कलाकारानी हातात घेऊन आंदोलन केले. 'रद्द करा रद्द करा, केशवराव भोसले नाट्यगृहाचे खाजगीकरण रद्द करा, नाट्यगृहाचे खाजगीकरण करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो.' अशा घोषणा देत रंगकर्मीकोल्हापूर महापालिकेचा निषेध केला. महापालिका प्रशासनाने संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाचा निर्णय रद्द केला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes