उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेनेतर्फे वृक्षारोपण
schedule28 Jul 26 person by visibility 12 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा शिक्षक सेनेतर्फे सोनतळी व कोल्हापूर स्काऊट गाईड कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थी व समाजापर्यंत पोहचावा या प्रमुख उद्देशाने कैलासपती, कदंब अशा वनस्पतीचे संवर्धन होण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिक्षक सेना पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संतोष आयरे, जिल्हाध्यक्ष अरुण मुजुमदार, रंगराव कुसाळे, जिल्हा कार्याध्यक्ष एम एन पाटील,वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल पाटील,स्काऊट गाईड जिल्हा संघटक कविता चौगुले,गोरक्ष पाटील,शिवाजी मेंडले,प्रबोधनकार ठाकरे हायस्कूलचे मुख्याध्यापक नितीन पडळकर उपस्थित होते.