Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नवा नेता…नवा पक्ष ! वर्षभरात ५० नगरसेवकांचे पक्षांतर ! !शिक्षकांना त्रास दिला तर ते विद्यार्थी कसे घडवतील ? आमदार रोहित पाटील, जयंत आसगावकरांनी टीईटी सक्तीवरुन वेधले सरकारचे लक्षमहापलिकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने मागितल्या वीस जागा ! इंडिया आघाडीत चर्चा सुरू ! !आयटी पार्क स्थापनेसह जागा उपलब्धतेस सरकारची मंजुरी -आमदार राजेश क्षीरसागर मेरी वेदर क्रिकेट क्लबतर्फे पंचगंगा स्मशानभूमीला शेणीदान कोल्हापूरच्या आयटी पार्कचा निर्णय अंतिम टप्प्यात, अमल महाडिकानी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट भाऊ पाध्ये हे मानवतावादी, अनुभववादी लेखक - समीक्षक प्रा. अविनाश सप्रे कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याघघ ततकोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यास तत्वत: मान्यता - राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावा, क्रीडामंत्र्यांचे विधीमंडळात उत्तर !!

जाहिरात

 

चित्रकाराची शिवभक्ती, चित्रातून उलगडला शिवछत्रपतींचा इतिहास !

schedule06 Jun 25 person by visibility 616 categoryसामाजिक

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : छत्रपती शिवाजी महाराज साऱ्यांचे आराध्य दैवत. शिवचरित्रातील प्रत्येक प्रसंग प्रेरणादायीशिवकाळातील इतिहास हा रोमांच फुलविणारानवं ऊर्जा निर्माण करणारालहान असो की मोठा साऱ्यांनाच इतिहास प्रियकोल्हापुरातील ८३ वर्षीय  चित्रकार प्रभाकरपतं कटके-निंबाळकर यांची शिवभक्ती तर अफलातून. ते मुळात चित्रकार. त्यांनी वयाच्या सत्तरीनंतर हाती ब्रश घेतलाआणि शिवचरित्रातील विविध प्रसंग कॅनव्हासवर साकारले शिवरायांचे बालपण ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा प्रवास चित्राद्वारे रेखाटला. अन् चित्रातून उलगडलेला शिवछत्रपतींचा इतिहास कोल्हापूरकरांना पाहण्यासाठी शाहू स्मारक भवन येथील कलादालन येथे मांडला आहे.

प्रदर्शनात शिवचरित्रातील विविध प्रसंगावर आधारित सतरा पेटिंग्ज आहेत. जलरंग व तैलरंगातील या चित्रकृती शिवकाल जिवंत करतात. राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट, शाहिस्तेखानाची फजिती, अफजलखानाचा वध, नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पराक्रम, उंबरखिंडीतील लढाई यावर आधारित चित्रे इतिहास उभी करतात. छत्रपती शहाजीराजे व शिवाजी महाराज यांच्या भेटीवर आधारित चित्रकृती मनाला स्पर्शून जाते. शिवराज्याभिषेक सोहळ्यावर आधारित चित्र पाहताना प्रेक्षक आपसूक शिवकाळात हरवतो. या प्रदर्शनात कलातपस्वी आबालाल रहमान यांनी काढलेल्या चित्रावर आधारित चित्र आहे. कलातपस्वींनी छत्रपती शिवरायांचे चित्र रेखाटले होते. त्या चित्रासारखी हुबेहूब चित्र प्रदर्शनात आहे.

 या चित्रकृती आणि प्रदर्शनाविषी बोलताना चित्रकार प्रभाकरपंत कटके-निंबाळकर म्हणाले, ‘लहानपणापासूनच मला इतिहासाची आवड. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम प्रेरणादायी. इतिहासातील अनेक प्रसंग खुणावत असतात. शिवचरित्रातील निवडक प्रसंगावर चित्रे रेखाटली. दहा-बारा वर्षापूर्वीची ही चित्रे आहेत. यंदा, शिवराज्याभिषेक सोहळयाचे औचित्य साधून शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन भरविले आहे.’

 चित्रकार प्रभाकरपंत कटके यांची ही शिवभक्ती आणि चित्रकलेची आवड सारं अफलातून. कटके हे कळंबा  शिवप्रभूनगर येथील. १९५७ मध्ये कलानिकेतमधून ते इंटरमिजीएट झाले. त्यावेळी कलानिकेतन हे महाद्वार रोड येथे होते. कटके यांच्या वडिलांचा कापड विक्रीचा व्यवसाय. वडिलोपार्जित व्यवसाय त्यांनी सांभाळला. यामुळे आवडत्या कलाविश्वापासून ते काही वर्षे लांब राहिले. मात्र चित्रकलेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. वयाच्या ७० नंतर त्यांनी पुन्हा ब्रश हाती घेतला. रंगाशी दोस्ती जमली. कॅनव्हासवर एकेक कलाकृती अवतरु लागल्या. इतिहासाची आवड असणाऱ्या चित्रकार कटके यांनी शिवचरित्रातील विविध प्रसंग चित्रबद्ध केले. त्यांच्या चित्रांची ही दुनिया, यंदा कोल्हापूरवासियांसमोर उलगडली आहे. चार जून ते दहा जून २०२५ या कालावधीत दसरा चौक येथील शाहू स्मारक भवनमधील कलादालन येथे प्रदर्शन खुले आहे. यंदाच्या, शिवराज्याभिषेक सोहळयासाठी ही अनोखी पर्वणी ठरणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes