Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवकालीन बारा किल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन ! पन्हाळा, रायगड, प्रतापगडचा समावेश शक्तीपीठ महामार्गवरुन शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरविण्याचा विरोधकांचा प्रयत्न : आमदार राजेश क्षीरसागरमहानंदा मोहिते यांच्या घुंगुरमाळा कवितासंग्रहाचे शनिवारी प्रकाशनआई अंबाबाई, शक्तिपीठ महामार्ग रद्द होऊ दे ! शेतकऱ्यांची शेती वाचू दे !!शिक्षक - संस्था चालकांनी उगारली आंदोलनाची छडी ! अन्यायी संच मान्यतेच्या विरोधात कोल्हापुरात जंगी मोर्चा !!कोल्हापुरात वंध्यत्व विषयक दोनदिवसीय कार्यशाळानूतन मराठी विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरीपाचवी शिष्यवृत्ती, आठवी एनएमएमएस परीक्षेसंबंधी शिक्षकांसाठी कार्यशाळाजरगनगरातील प्री-प्रायमरी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमाकोल्हापूर जिल्हा शंभर टक्के साक्षर बनविण्यासाठी प्लॅनिंग-जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

जाहिरात

 

कॅरम बोर्डवर रंगला नेत्यांचा खेळ ! राजकारणात नवा दोस्ताना !

schedule17 Jun 25 person by visibility 336 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : निवडणूक विधानसभेची असो की लोकसभेचीविरोधी आघाडीतून एकमेकांविरुद्ध. एक जण नेते मंडळीसाठी लढायचा तर दुसरे स्वत : मैदानात. दोन्ही गटात कमालीची ईर्षा. महापालिका सभागृहातही या दोन गटातील शह-काटशह रंगायचा. मात्र राजकारणात कोणी कोणी कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूहीयाची प्रचिती नुकतीच राजोपाध्येनगर येथे आली.

स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांच्या पुढाकाराने शारंग कॅरम चषक स्पर्धा आयोजित केली होती. ‘कै. वसंतराव जयवंतराव देशमुख’ यांच्या स्मरणार्थ आायेजित या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला राजकीय नेते मंडळी उपस्थित राहिलेपालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील आणि माजी नगरसेवक देशमुख यांच्यामध्ये कॅरम बोर्डवर स्पर्धा रंगली. आबिटकर-महाडिक एका बाजूला आणि पाटील-देशमुख एका बाजूला हे चित्रकॅरम बोर्डवर हे एकमेकांविरुद्ध खेळताना दिसत असले तरी राजकीय पटलावर त्यांच्यामध्ये दोस्ताना झाला आहे.

माजी स्थायी समिती सभापती देशमुख हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीपासून ते काँग्रेसपासून दुरावले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांचे ते कट्टर समर्थक अशी ओळख. विधानसभा, लोकसभा व महापालिका निवडणुकीत ते आमदार पाटील यांच्यासाठी किल्ला लढवायचे. समोर विरोधक म्हणून महाडिक. महापालिका सभागृहातही पाटील आणि महाडिक गटातील राजकीय वादाचे पडसाद उमटले. तेथेही ही मंडळी आपआपला गट सांभाळण्यासाठी पुढे. मात्र राजकारणात काही स्थिर नसतेयाचे दर्शन घडत आहे.

विधानसभेपासून काँग्रेसपासून लांब गेलेले देशमुख आता महायुतीकडे झुकले आहेत. त्यांनी आयोजित कॅरम स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला महायुतीचे नेते व पालकमंत्री आबिटकर, खासदार महाडिक उपस्थित राहिले. प्रा. जयंती पाटील ही उपस्थित होते. बदलत्या राजकारणाचे हे चित्र. या चौघांमध्ये कॅरमचा सामना रंगला. विजयी कोण होणार त्यांच्या निशाण्यावर कोण ? याची चर्चा मात्र रंगत आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक विजय खाडे, अभिजीत चव्हाण,  सुनील देसाई आदी उपस्थित होते.

………………………

ना नजरानजरना बोलणे.हस्तांदोलन तर लांबच

बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम ही उपस्थित होते. कदम हे जवळपास वीस वर्षे खासदार महाडिक यांच्यासोबत आहेत. कोणतीही निवडणूक असो त्यांचा सहभाग ठरलेला. दरम्यान विधानसभा निवडणुकीत खासदार महाडिक आणि सत्यजित कदम यांचे बिनसले. कदम यांनी भाजपातून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांची खासदार महाडिक यांच्यावरील नाराजी अद्याप कायम असल्याचे कॅरम स्पर्धेच्या बक्षीस समारंभातही दिसले. बक्षीस समारंभाला एकत्र येऊनही त्यांच्यामध्ये ना नजरानजर झालीना बोलणे हस्तांदोलन तर लांबच असे चित्र होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes