Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ताराराणी महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन, सासने मैदान येथे महोत्सव गोकुळकडून आईस्क्रीम निर्मिती, विविध फ्लेवरमध्ये उपलब्ध ! रविवारी शुभारंभ!!कोल्हापूर फर्स्ट पोहोचले दिल्लीत ! केंद्रीय मंत्र्यांच्यासोबत रेल्वे- रस्ते- पर्यटनासंबंधी चर्चा !!सुर्यकांत पाटलांचा बाजार समिती सभापतिपदाचा राजीनामा, राजकीय संन्यासाची घोषणा शिवाजीराव कदमांचे स्मारक विधायक कार्यासाठी प्रेरणादायी ! गणेश पतसंस्थेच्या प्रांगणात पुतळयाचे अनावरण !!कृष्णराज महाडिक दिल्लीत, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची घेतली भेट करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शन व्यवस्थेत बदल ईद फेस्टिव्हलचे मंगळवारी उद्घाटनमहापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ  नाही - सत्ताधारी नगरसेवकांची व्यावसायिकांना ग्वाहीवरिष्ठ शिक्षकांना टीईटीमधून सूट द्यावी, खासदार धनंजय महाडिकांची संसदेत मागणी

जाहिरात

 

ताराराणी महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन, सासने मैदान येथे महोत्सव

schedule14 Mar 26 person by visibility 51 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या 'ताराराणी महोत्सव' व 'मिनी सरस' जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री  प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील सासने मैदानावर आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी फीत कापून प्रदर्शनाचे अधिकृत उद्घाटन केले आणि त्यानंतर सर्व विक्री स्टॉल्सना भेट देऊन महिलांच्या उत्पादनांची पाहणी केली.

 पालकमंत्री  आबिटकर म्हणाले ,  प्रदर्शनांच्या आयोजनातून महिला भगिनी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ही मोठी संधी उपलब्ध करून दिली जात असून महिलांना कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जात आहे. मात्र, हा निधी केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता तो गटातील प्रत्येक महिला सदस्याच्या स्वप्नांना पाठबळ देणारा ठरावा. प्रत्येक बचत गटाने आपल्या सर्व सदस्यांचे हित जोपासत कार्य करणे आवश्यक आहे. 

 पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते भुदरगड तालुक्यातील बचत गटांना 3 कोटी ७३ लाख, राधानगरी तालुक्यात ६ कोटी ८७ लाख, करवीर तालुक्यासाठी १४ कोटी १ लाख तर हातकणंगले तालुक्यासाठी ४ कोटी ५१ लाख रूपयांचा समुदाय गुंतवणूक निधीचे बचत गटांना वितरण करण्यात आले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी प्रास्ताविक केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले यांनी छत्रपती शाहू महाराज ग्रामपंचायत कर्मचारी विमा योजनेबाबत सविस्तर माहिती दिली.  प्रातिनिधिक स्वरूपात काही कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते अपघाती विमा कवच प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या सोहळ्याला आमदार अशोकराव माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  ओमप्रकाश यादव, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र सूर्यवंशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, कल्याण निकम यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.  ताराराणी महोत्सव १८ मार्चपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार असून, कोल्हापूरच्या नागरिकांनी या ठिकाणी भेट देऊन महिलांच्या कर्तृत्वाचे, कौशल्याचे आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे खरेदी करून त्यांना पाठबळ द्यावे, असे आवाहन प्रशासनाने करण्यात केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes