Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ताराराणी महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन, सासने मैदान येथे महोत्सव गोकुळकडून आईस्क्रीम निर्मिती, विविध फ्लेवरमध्ये उपलब्ध ! रविवारी शुभारंभ!!कोल्हापूर फर्स्ट पोहोचले दिल्लीत ! केंद्रीय मंत्र्यांच्यासोबत रेल्वे- रस्ते- पर्यटनासंबंधी चर्चा !!सुर्यकांत पाटलांचा बाजार समिती सभापतिपदाचा राजीनामा, राजकीय संन्यासाची घोषणा शिवाजीराव कदमांचे स्मारक विधायक कार्यासाठी प्रेरणादायी ! गणेश पतसंस्थेच्या प्रांगणात पुतळयाचे अनावरण !!कृष्णराज महाडिक दिल्लीत, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची घेतली भेट करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शन व्यवस्थेत बदल ईद फेस्टिव्हलचे मंगळवारी उद्घाटनमहापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ  नाही - सत्ताधारी नगरसेवकांची व्यावसायिकांना ग्वाहीवरिष्ठ शिक्षकांना टीईटीमधून सूट द्यावी, खासदार धनंजय महाडिकांची संसदेत मागणी

जाहिरात

 

गोकुळकडून आईस्क्रीम निर्मिती, विविध फ्लेवरमध्ये उपलब्ध ! रविवारी शुभारंभ!!

schedule14 Mar 26 person by visibility 76 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ  यशस्वी वाटचालीची ६३ वर्षे पूर्ण करीत आहे. या दिनाचे औचित्य साधून संघामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन रविवारी 15  मार्च २०२६  रोजी गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्यात आले आहे. यामध्ये विविध फ्लेवर्समधील प्रिमियम क्वालिटीच्या ‘गोकुळ आईस्क्रीम’चा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच २०२४–२५ या वर्षातील ‘गोकुळ श्री’ पुरस्कार विजेत्यांचा गौरव सोहळा ही आयोजित करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय स्तरावर गाय व म्हैस यांचे जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या संस्था, म्हशीचे जास्तीत जास्त दूध पुरवठा करणारे उत्पादक, म्हशीचे उत्तम प्रतीचे दूध पुरवठा करणारे उत्पादक तसेच गाय / म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या महिला दूध संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. 

 कोल्हापूर, पुणे व मुंबई येथे जास्तीत जास्त दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दूध वितरकांचाही सत्कार  करण्यात येणार आहेत. गेल्या काही वर्षापासून गोकुळच्या वितरक वा ग्राहकांकडून ‘गोकुळचे आईस्क्रीम’ मार्केटमध्ये उपलब्ध करून देण्यात यावे अश्या प्रकारची मागणी केली जात होती. त्याप्रमाणे गोकुळच्या तज्ञ अधिका-यांचे देखरेखीखाली आईस्क्रीम तयार करून घेतले आहे. आईस्क्रीममध्ये म्हैस दूध, स्किम मिल्क पावडर, म्हैस लोणी व गाय किस व नॅचरल फ्लेवर वापरणेत आले आहेत. गोकुळचे आईस्क्रीम हे कप पॅकींग, कोन पॅकींग, फॅमिली पॅक या व्हेरीयंटमध्ये उपलब्ध आहे. मँगो, नॅचरल व्हेनीला, बेल्जीयन चॉकलेट, बटर स्कॉच, हॅअलनट कन्च, बिसकोटी बिस्कॉफ व अफगाण ड्रायफ्रूट, राजभोग या फ्लेव्हरमध्ये उपलब्ध आहेत.

संघाचे फुलक्रीम व गाय दूधास ज्या प्रकारे मुंबई व पूणे येथे चांगली मागणी आहे. त्याप्रमाणेच गोकुळच्या आईस्क्रीमला देखील मुंबई व पूणे मार्केटमधून चांगला प्रतिसाद मिळेल याचा विश्वास यावेळी संचालक मंडळाने व्यक्त केला. 

गुढी पाडवा, रमजान ईद सणाच्या काळांत तसेच सध्या उन्हाळ्याचा सिझन असलेने गोकुळच्या ग्राहकांनी दूध व दुग्धजन्य पदार्था बरोबराच गोकुळचे आईस्क्रीमचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संघाचे चेअरमन श्री. नविद मुश्रीफ यांनी केले.

या कार्यक्रमास मंत्री  हसन मुश्रीफ,  पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि  आमदार सतेज पाटील , आमदार विनय कोरे , आमदार चंद्रदीप नरके,  गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes