Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ढढ यययगोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश- नविद मुश्रीफ यांची माहिती कोरोनाशी भिडताना हे पुस्तक एका संकटाचा दस्ताऐवज नसून मानवी जिद्दीची गाथा - मंत्री हसन मुश्रीफरूट ३२ मुक्तहास्य स्पर्धा, विजेत्यांना लाख रुपयांची बक्षीसेकोल्हापुरात तीस एप्रिलपासून एक दिवसआड पाणी पुरवठामहाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर ! वसंत भोसले, महावीर अक्कोळे, निलम माणगावेंचा समावेश ! !रग्गेडियन फिटनेस क्लब - कोरगावकर ग्रुपतर्फे मोफत आरोग्य तपासणी कागदावरच्या बोगस दूध संस्था रद्द करा, अन्यथा त्यांच्याच सात पिढ्या गोकुळवर राज्य करतीलभाजपच महिला आरक्षणाच्या विरोधात, लोकांची दिशाभूल करण्यासाठी आता मोर्चोचे सोंग - आमदार विश्वजीत कदमकोल्हापूरच्या विकासाचा बनणार ॲक्शन प्लॅन : मंत्री, आमदारांच्या उपस्थितीमध्ये २८ विषयावर चर्चा

जाहिरात

 

कलाकार आहेत म्हणून समाज आहे- प्रकुलगुरू ज्योती जाधव

schedule15 Mar 26 person by visibility 165 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कलाकार आहेत म्हणून समाज आहे. कोल्हापूरला कलेची मोठी परंपरा आहे. कलेचे उच्च शिक्षण कोल्हापुरातच मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. कला  परंपरा जपणाऱ्या कॉलेजनी तसे प्रस्ताव  शिवाजी विद्यापीठाकडे दिले तर सकारात्मक विचार करू, अभ्यासक्रम कसे सुरु करता येतील ते पाहू’ अशी ग्वाही शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी दिली.
गुरुवर्य टी. के. वडणगेकर यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित 'गुरुशिष्य' कला प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
  दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन कला दालनात झालेल्या या कार्यक्रमास आर्किटेक्ट गजेंद्र साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान शहर डीवायएसपी प्रिया पाटील यांनी प्रदर्शनास भेट दिली.
यावेळी चित्रकार दुर्गा आजगांवकर यांना के. आर. कुंभार उपक्रमशील युवा कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  प्राचार्य अजेय दळवी यांनी स्वागत केले. प्राचार्य मनोज दरेकर यांनी प्रास्ताविक केले. नागेश हंकारे यांनी सूत्रसंचालन केले. विजय टिपूगडे यांनी आभार मानले. दरम्यान पंधरा ते २१ मार्च २०२६ या कालावधीत शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन भरविले आहे. सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत प्रदर्शन खुले आहे.

 प्रदर्शनात विजय टिपुगडे, अजेय दळवी,विलास बकरे, संतोष पोवार,मनोज दरेकर, बबन माने, नागेश हंकारे, अभिजीत कांबळे, प्रवीण वाघमारे, गजेंद्र वाघमारे, पूनम राऊत, शुभम चेचर, दुर्गा आजगांवकर, विजय उपाध्ये, राज इंचनाळकर, पुष्कराज मेस्त्री, सुदर्शन वंडकर, सर्वेश देवरुखकर, शैलेश राऊत, भाऊसो पाटील, रमजान मुल्ला, शुभम कुंभार, ज्ञानेश पोवार, प्रकाश मोहिते, राहुल रेपे, आरिफ तांबोळी, अनंत भोगटे, अजय ढवळे,  ओंकार राऊत, देवयानी देवरुखकर, विवेक कवाळे, शशांक घाटगे यांच्या कलाकृतीचा समावेश आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes