Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवाजीराव कदमांचे स्मारक विधायक कार्यासाठी प्रेरणादायी ! गणेश पतसंस्थेच्या प्रांगणात पुतळयाचे अनावरण !!कृष्णराज महाडिक दिल्लीत, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची घेतली भेट करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शन व्यवस्थेत बदल ईद फेस्टिव्हलचे मंगळवारी उद्घाटनमहापालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही व्यावसायिक वाढ  नाही - सत्ताधारी नगरसेवकांची व्यावसायिकांना ग्वाहीवरिष्ठ शिक्षकांना टीईटीमधून सूट द्यावी, खासदार धनंजय महाडिकांची संसदेत मागणीकुलगुरुपदासाठीच्या अर्जांचे शॉर्टलिस्ट, २५ जणांची यादी तयार ! एप्रिलमध्ये मुलाखती ! !जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनएलआयसीचे निवृत्त अधिकारी नंदकुमार जाधव यांचे निधन हरिप्रिया एक्स्प्रेसमधील कमी केलेल्या प्रवासी डब्यांची संख्या पूर्ववत करा-

जाहिरात

 

शिवाजीराव कदमांचे स्मारक विधायक कार्यासाठी प्रेरणादायी ! गणेश पतसंस्थेच्या प्रांगणात पुतळयाचे अनावरण !!

schedule14 Mar 26 person by visibility 22 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : कोल्हापूर शहराचे माजी महापौर व गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक शिवाजीराव मारुतराव कदम यांनी समाजातील विविध घटकांसाठी काम केले. सामाजिक, सहकार, राजकारण, कृषी क्षेत्र्घत आदर्शवत कामगिरी केली. ते प्रगतशील शेतकरी होते. तसेच त्यांना समाजातील सामान्य घटकांसाठी कळवळा होता. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गणेश नागरी सहकारी पतसंस्थेने साकारलेले स्मारक हे नेहमी विधायक कार्यासाठी प्रेरणादायी ठरेल अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.

माजी महापौर शिवाजीराव कदम यांचा पुतळा कदमवाडी येथील गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रागंणात साकारला आहे. महापौर रुपाराणी निकम यांच्या हस्ते व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी, (१३ मार्च २०२६) सायंकाळी पुतळा अनावरणाचा कार्यक्रम झाला. आमदार अमल महाडिक, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, कोल्हापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष शिरीष कणेरकर, कमर्शियल बँकेचे अध्यक्ष अतुल शहा, सत्यशोधक बँकेचे अध्यक्ष महेंद्र शिंदे, शिवसेनेचे जिल्हा समन्यवक सत्यजीत कदम, माजी महापौर सुनील कदम, स्वरुप कदम, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष शंकर पाटील, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, गटनेते मुरलीधर जाधव, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. शिल्पकार प्रदीप कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.

पुतळा अनावरणप्रसंगी बोलताना महापौर निकम यांनी, ‘माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे स्मारक स्फूर्तिस्थान ठरेल. त्यांनी सामान्य माणसांच्या उत्कर्षासाठी कार्य केले. ते समाजसेवक होते. प्रगतशील शेतकरी होते. पतसंस्थेच्या माध्यमातून गरीब लोकांच्या आर्थिक अडचणी दूर केल्या.’असे सांगितले.गणेश नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष शशिकांत कदम यांनी माजी महापौर शिवाजीराव कदम यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. हे स्मारक विधायक कार्यासाठी सदैव प्रेरणा देत राहील असे नमूद केले. यावेळी श्रीमती शंकुतला शिवाजीराव कदम, मंगल महाडिक, भरत कदम, संतोष कदम, नगरसेवक वैभव माने, स्वरुप कदम, रत्नेश शिरोळकर, विजेंद्र माने, प्रमोद देसाई, अभिजीत खतकर, राजनंदा महाडिक, अर्चना पागर, प्राजक्ता जाधव, माजी नगरसेवक निलेश देसाई, नारायण बुधले, अशोक जाधव, दत्तात्र इंगवले, अभय तेंडूलकर, भगवान काटे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes