Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
 महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित, अध्यक्ष-उपाध्यक्षपद सव्वा वर्षासाठी !  पाच वर्षात ४ अध्यक्ष-उपाध्यक्ष, २० सभापती ! !गोकुळच्या कार्यक्रमात सतेज पाटलांची राजकीय टोलेबाजी, मुश्रीफ-नरकेंच्या उपस्थितीत महाडिकांना डिवचले ! आबिटकर, कोरे कार्यक्रमाला अनुपस्थित ! !डिबेंचर्सच्या रकमेबाबत दूध संस्थांना अपेक्षित निर्णय होईल – हसन मुश्रीफकलाकार आहेत म्हणून समाज आहे- प्रकुलगुरू ज्योती जाधवभैया मानेंना काँग्रेसचाच पर्याय,  महायुतीच्या भांडणात उमेदवारीच्या लॉटरीची शक्यता कमी - सतेज पाटीलप्रा.. शशिकला सरगर यांना महाराणी ताराराणी पुरस्कार प्रदानताराराणी महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन, सासने मैदान येथे महोत्सव गोकुळकडून आईस्क्रीम निर्मिती, विविध फ्लेवरमध्ये उपलब्ध ! रविवारी शुभारंभ!!कोल्हापूर फर्स्ट पोहोचले दिल्लीत ! केंद्रीय मंत्र्यांच्यासोबत रेल्वे- रस्ते- पर्यटनासंबंधी चर्चा !!सुर्यकांत पाटलांचा बाजार समिती सभापतिपदाचा राजीनामा, राजकीय संन्यासाची घोषणा

जाहिरात

 

 महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित, अध्यक्ष-उपाध्यक्षपद सव्वा वर्षासाठी !  पाच वर्षात ४ अध्यक्ष-उपाध्यक्ष, २० सभापती ! !

schedule15 Mar 26 person by visibility 756 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर   :  कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सदस्यांच्या ६८ पैकी ५१ जागा महायुतीला मिळाल्या आहेत. निर्विवाद बहुमत मिळाल्याने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच  होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रमुख नेत्यांची रविवारी, १५ मार्च २०२६ रोजी कोल्हापूर विमानतळावर बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. पण पहिल्या वर्षी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण आणि कोणत्या पक्षाचा होणार, याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे.

अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद सव्वा वर्षासाठी तर सभापतीची ४ पदे एक वर्षासाठी देण्याचा निर्णय झाला. या फॉर्म्युल्यानुसार ५ वर्षात जिल्हा परिषदेला ४ अध्यक्ष, ४ उपाध्यक्ष आणि २० सभापती मिळणार आहेत. महायुतीच्या ५१ पैकी २८ सदस्यांना ५ वर्षात संधी मिळणार आहे. १७ मार्च रोजी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड होणार आहे. पण अध्यक्षपदाच्या नावाचा सस्पेन्स कायम आहे. विमानतळ येथे झालेल्या उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, प्रा. जयंत पाटील, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम आणि माजी आमदार सुजीत मिणचेकर बैठकीला उपस्थित होते.
 कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. जिल्हा परिषदेच्या ६८ पैकी ५१ जागा महायुतीला मिळाल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी २०, भाजप १२, शिवसेना ९, शाहू आघाडी ४, जनसुराज्य ५ आणि १ अपक्ष महायुतीकडे आहे. या बैठकीत जिल्हा परिषदेतील सत्ता वाटपावर चर्चा झाली. ५ वर्षात ४ अध्यक्ष आणि ४ उपाध्यक्ष होतील. बांधकाम आणि आरोग्य, अर्थ आणि शिक्षण, समाजकल्याण तसेच महिला बालकल्याण या ४ सभापती पदासाठी एका सदस्याला एक वर्ष संधी दिली जाईल. म्हणजेच ५ वर्षात २० सभापती होतील. एकूणच महायुतीच्या ५१ सदस्यांपैकी २८ सदस्यांना ५ वर्षात पदे मिळणार आहेत. उपाध्यक्षांकडे कृषी आणि पशुसंवर्धन समिती राहील. एकूणच महायुतीने अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि सभापतीपद वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes