काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर होणार, तीस उमेदवारांची घोषणा शक्य
schedule26 Dec 25 person by visibility 62 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेस पक्षातर्फे तीस उमेदवारांची घोषणा शुक्रवारी (२६ डिसेंबर २०२५) करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने तयारी केली आहे. इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविणे, इच्छुकांच्या मुलाखती या सगळया प्रक्रिया पार पडल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस जवळपास ७० जागा लढविणार असल्याचे वृत्त आहे. शिवसेना ठाकरे पक्ष आणि काँग्रेसची आघाडी आहे. शिवसेना ठाकरे पक्षाला बारा जागा देण्यात येणार आहेत. त्यापैकी सात जागा निश्चित झाल्या आहेत. आणखी पाच जागावर शिवसेनेचे पदाधिकारी आणि काँग्रेसची समिती यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान काँग्रेस पहिल्या टप्प्यात तीस उमेदवार घोषित करणार आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील हे पुण्यात आहेत. ते पुण्याहून कोल्हापुरात पोहोचले की कोल्हापूर महापालिकेसाठी तीस उमेदवारांची घोषणा होऊ शकते.