जिल्हा परिषद अध्यक्ष शालेय चषक क्रीडा स्पर्धेत राधानगरी तालुक्याला विजेतेपद ! करवीर, चंदगडचीही छाप ! !
schedule25 Dec 25 person by visibility 36 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे आयोजित जिल्हा परिषद अध्यक्ष शालेय चषक विद्यार्थी क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तालुकास्तरावरील विजेते संघ व खेळाडू तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांनी आपला सहभाग नोंदविला. राजर्षी शाहू छत्रपती क्रीडा प्रशाला शिंगणापूर येथे सांघिक स्पर्धा व मैदानी स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेमध्ये राधानगरी तालुक्याला सर्वसाधारण विजेतेपद तर करवीर व चंदगड तालुक्याला अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोषकुमार जोशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, उपशिक्षणाधिकारी आर.व्ही. कांबळे, आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी सरकारी शाळांतील शिक्षकांचे योगदान व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचे देखील कौतुक केले. क्रीडा स्पर्धांमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण विकसित होतात. सांघिक खेळांमुळे इतरांसोबत मिळून काम करण्याची वृत्ती वाढते.शिस्त आणि नियमांचे पालन: खेळातील नियम आणि शिस्तीमुळे जीवनातही शिस्त लागते. खेळातून आलेल्या अनुभवामुळे मानसिकदृष्ट्या कणखर बनतात.यश-अपयशामुळे आत्मविश्वास वाढतो आणि प्रेरणा मिळते. अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या