Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
काँग्रेसची पहिली यादी आज जाहीर होणार, तीस उमेदवारांची घोषणा शक्यशिक्षकांकडे मुलांकडील बुद्धिमत्ता-कौशल्ये ओळखण्याची कला हवी : सरोज पाटीलडीवाय पाटील अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांची प्रजासत्ताकदिन परेडसाठी निवड जिल्हा परिषद अध्यक्ष शालेय चषक क्रीडा स्पर्धेत राधानगरी तालुक्याला विजेतेपद ! करवीर, चंदगडचीही छाप ! !वारणा विद्यापीठातर्फे पन्हाळा मोहिमेतून महाराणी ताराबाईंच्या इतिहासाचा जागर आता चर्चा फक्त सतेज पाटलांच्यासोबतच, काँग्रेसने डावलले तर राष्ट्रवादीची वाट वेगळीकरवीर पंचायत पतसंस्थेतील अपहार प्रकरणी चौघांना अटकदेशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन, तंत्रज्ञान विकास केंद्रे म्हणून कार्य करावे- डॉ. सतीश भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन, नवोन्मेष तंत्रज्ञान विकासाची केंद्रे म्हणून कार्य करावेशिवसेना ठाकरे पक्षाला महापालिकेत 12 जागा , काँग्रेस सोबत आघाडी

जाहिरात

 

शिक्षकांकडे मुलांकडील बुद्धिमत्ता-कौशल्ये ओळखण्याची कला हवी : सरोज पाटील

schedule26 Dec 25 person by visibility 21 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘संस्कारक्षम पिढी घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलांमध्ये वेगवेगळी बुद्धिमत्ता असते. मुलांमधील बुद्धिमत्ता,कौशल्य ओळखण्याची कला शिक्षकांकडे हवी. शिक्षकांनी मुलांना प्रोत्साहित केले तर निश्चितच गुणवत्तापूर्ण व संस्कारक्षम विद्यार्थी घडतील.’असे मत श्रीमती सरोज एन पाटील यांनी व्यक्त केले.

 गडहिंग्लज येथील विद्या प्रसारक मंडळ व जागृती माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार श्रीमती सरोज पाटील यांना प्रदान करण्यात आला.शाल, श्रीफळ,मानपत्र व रोख पंचवीस हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. सतीश घाळी यांच्या हस्ते श्रीमती पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश तुरबतमठ यांची उपस्थिती होती. घाळी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. दरम्यान श्रीमती पाटील यांनी पुरस्काराची रक्कम वाळवा तालुक्यातील ढवळी येथील राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील विद्यालयातील एआय लॅबसाठी दिली.

याप्रसंगी बोलताना श्रीमती पाटील यांनी आपले अनुभवविश्व उलगडले. लहानपणापासून आतापर्यंतचा प्रवास हा विचार आणि संस्कारांनी भारलेला असल्याचे त्यांनी नमूद केले. आईवडिलांचे संस्कार,एन. डी. पाटील यांच्या सोबतच्या चळवळीतील आठवणी सांगत मुलांना प्रभावित केले. डॉ. घाळी व नगराध्यक्ष तुरबतमठ यांची भाषणे झाली. संस्थेचे सहसचिव गजेंद्र बंदी यांनी स्वागत केले. प्रा. शिवाजी पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रा. आशपाक मकानदार, प्रा. अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सचिव अॅड. बी. जी. भोसकी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर, संचालक विकास पाटील, किशोर हंजे, महेश घाळी, उदय जोशी, बाळासाहेब पाटील औरनाळकर, प्रा.किसनराव कुराडे, राजशेखर यरटे, महादेव साखरे, महाबळेश्वर चौगुले, प्राचार्य दत्ता पाटील, श्रीरंग ताबे, उमेश सावंत, शिवाजी अनावरे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes