चौथी - सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा 26 एप्रिलला
schedule02 Jan 26 person by visibility 35 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 4 थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 7वी ) 26 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.