Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या राजकारणात आमनेसामने उभे ठाकलेले एसटी बसेसच्या उद्घाटनला एकत्रविद्यार्थी चमकले शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत, शाळेने काढली मिरवणूक झोकात!व्यापारी किशोरकुमार नष्टे यांचे निधनजुनी पेन्शनसाठी शिक्षकदिनी शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चानैसर्गिक न्यायतत्वाद्वारे त्या संस्थांनाही मतदानाचा अधिकार मिळावा -विकास पाटील कुरुकलीकरकोल्हापुरात मंगळवारी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनविवेकानंद संस्थेकडून ४४ हजार फॉर्म जमा, चंद्रकांत पाटील म्हणाले, तर कौस्तुभला तिकीट अन् विजयही निश्चितस्थायी समितीत पाठपुरावा, ४३३ ग्रामपंचायतीला मिळाले आर्थिक खर्चाचे अधिकारविवेकानंद शिक्षण संस्था ठरवेल तोच  पुणे शिक्षक मतदारसंघाचा आमदार असेल - मंत्री चंद्रकांत पाटीलन्यायालयाच्या निर्णयांचा चुकीचा अर्थ काढून बोगस संस्थांना अभय

जाहिरात

 

गोकुळच्या राजकारणात आमनेसामने उभे ठाकलेले एसटी बसेसच्या उद्घाटनला एकत्र

schedule22 Aug 26 person by visibility 58 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ आणि चंदगड- गडहिंग्लचे आमदार शिवाजीराव पाटील हे दोघे महायुतीचे घटक. मात्र गोकुळच्या राजकारणात दोघांमध्ये छत्तीसचा आकडा. आमदार पाटील यांनी तर गोकुळच्या कामकाजावरुन मंत्री मुश्रीफ यांनाही लक्ष्य केले. तर मुश्रीफ यांनी कधी शेलक्या शब्दांत तर कधी टीकेचे आसूड ओढत उत्तर दिले. गोकुळच्या राजकारणावरुन आमनेसामने उभे ठाकलेल हे दोघे शनिवारी, २२ ऑगस्ट २०२६ रोजी एकत्र आले. निमित्त होतं, गडहिंग्लज बस डेपोला मिळालेल्या नवीन एसटी बसेसच्या उद्घाटनचे. हे दोन्ही नेते एसटी बसेसच्य उद्घाटननिमित्त एका व्यासपीठावर आल्याने कार्यकर्त्यामध्ये उत्सुकता वाढली होती. दोघेही गोकुळच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात वक्तव्ये करत असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश हा अंतिम असल्याचेही ते म्हणतात.

मंत्री मुश्रीफ व आमदार पाटील यांच्या हस्ते पाच नवीन बसेसचे पूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या नवीन बसेसमुळे गडहिंग्लज परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य प्रवाशांना अधिक चांगली, सुरक्षित व सुलभ एसटी सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी बोलताना आमदार पाटील यांनी, ‘एसटी सेवेला अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन ५ एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रवाशांची सोय आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आमचे प्रयत्न यापुढेही सातत्याने सुरू राहतील’असे सांगितले. तर मुश्रीफ यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. मंत्री मुश्रीफ यांनीही प्रवासी वर्गाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes