कोल्हापुरात मंगळवारी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन
schedule22 Aug 26 person by visibility 6 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :साहित्यरत्न सत्यशोधक अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीतर्फे मंगळवारी, २५ ऑगस्ट २०२६ रोजी शाहू स्मारक भवन येथे ’सत्यशोधक अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन’आयोजित केले आहे. अशी माहिती जयंती समितीचे अध्यक्ष अब्राहम आवळे, प्रा. शरद गायकवाड यांनी दिली. संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. भारत पाटणकर भूषविणार आहेत. शाहीर सदाशिव निकम यांच्या शाहिरी जलशाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. संमेलनात दिवसभर विविध सत्रे होणार आहेत. खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. दुसऱ्या सत्रात सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची प्रस्तुतता या विषयी परिसंवाद आहे. तिसऱ्या सत्रात दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन आहे. तर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप होईल. पत्रकार परिषदेला डॉ. माधुरी चौगुले, बाजीराव नाईक, डॉ. अमोल महापुरे, प्रतिभा हेगडे आदी उपस्थित होते.