Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नैसर्गिक न्यायतत्वाद्वारे त्या संस्थांनाही मतदानाचा अधिकार मिळावा -विकास पाटील कुरुकलीकरकोल्हापुरात मंगळवारी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनविवेकानंद संस्थेकडून ४४ हजार फॉर्म जमा, चंद्रकांत पाटील म्हणाले, तर कौस्तुभला तिकीट अन् विजयही निश्चितस्थायी समितीत पाठपुरावा, ४३३ ग्रामपंचायतीला मिळाले आर्थिक खर्चाचे अधिकारविवेकानंद शिक्षण संस्था ठरवेल तोच  पुणे शिक्षक मतदारसंघाचा आमदार असेल - मंत्री चंद्रकांत पाटीलन्यायालयाच्या निर्णयांचा चुकीचा अर्थ काढून बोगस संस्थांना अभय एक राखी सीमेवरील जवानांसाठी,  स्वामी विवेकानंद ट्रस्टचा उपक्रमआर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेत कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचे यशजिल्हा परिषदेत सदभावना दिनानिमित्त अधिकारी -कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ  उद्योगरत्न पुरस्कार सोहळयात सचिन शिरगावकरांनी सांगितली यशाची चतु:सूत्री

जाहिरात

 

नैसर्गिक न्यायतत्वाद्वारे त्या संस्थांनाही मतदानाचा अधिकार मिळावा -विकास पाटील कुरुकलीकर

schedule22 Aug 26 person by visibility 15 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सुप्रीम कोर्टाने गोकुळ दूध् संघाशी संलग्नित अवसायनातील दूध संस्थांना पात्र ठरविले आहे. तेव्हा नैसर्गिक न्यायतत्वावर मतदानाचा अधिकार त्या दूध संस्थांना मिळायला हवा अशी मागणी प्राथमिक दूध उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींनी केली. सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने ही विनंती केली. कागल तालुक्यातील विकास पाटील कुरुकलीकर, बिद्री साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन मनोज फराकटे यांच्यासह दूध उत्पादक संस्था प्रतिनिधींचा समावेश होता. ‘प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी गेली, पाच, सहा महिने लढा देत आहेत. सर्किट बेंच, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत पाठपुरावा केला. अखेर सत्याचा विजय झाला. कोर्टाने, अवसायनातील संस्थांना पात्र करावे असे म्हटले आहे. यामुळे या संस्थांना मतदानाचा अधिकार मिळायला हवा. या संस्थांचा अंतिम मतदार यादीत समावेश करावा अशी मागणी केली.सभासद हा दूध उत्पादक आहे, यामुळे तो मतदानास पात्र ठरतो असेही प्रतिनिधी म्हणाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes