Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
श्री महालक्ष्मी अन्नछत्र ट्रस्टतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटपकरवीर पंचायत समितीतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देणार - साताप्पा पाटीलचाळीस वर्षे सेवा..कॉलेजवरील गेटवरचा शेवटचा निरोप…शिपाई मामांनी मारली सचिवांना मिठीकिरीट सोमय्या ना आमदार- ना खासदार, महापालिकेत येऊन बैठक घेण्याचा त्यांना काय अधिकार ? काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा हल्लाबोलप्रा. महेश वासुदेव गावडे यांना पीएचडीशिष्यवृत्तीतील यशानंतर आता गुणवत्तावाढीचे नवे लक्ष्य : सभापती शितल यादवकौशल्य विकासासाठी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन-  शिवाजी विद्यापीठात लवकरच सामज्यंस करार -कुलगुरू डॉ.राजनीश कामतएसआयआर प्रक्रियेत गंभीर त्रुटी, नोंदणीसाठी मुदतवाढ हवी : काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतली जिल्हा प्रशासनाची भेटगव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र पंदारे, उपाध्यक्षपदी विलासराव कुरणेआता प्रशासक राजवट नाही –कामकाजात सदस्यांना विश्वासात घ्या, अध्यक्षांचे खडेबोल ! शिक्षणाधिकारी रजेवर !

जाहिरात

 

कोल्हापुरात रंगतोय आयपीएल फॅन पार्क

schedule24 May 26 person by visibility 172 categoryक्रीडा

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : टाटा आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अनुषंगाने कोल्हापुरात फॅन पार्कचे आयोजन केले आहे. येथील मेरी वेदर मैदान येथे 23 व 24 मे 2026 या कालावधीत महोत्सव रंगत आहे. या फॅन पार्क अंतर्गत  क्रिकेट स्पर्धेचे थेट प्रक्षेपण  दाखवले जाणार आहे. अशी माहिती बीसीसीआयची प्रतिनिधी अलविन गायकवाड व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अभिजीत भोसले यांनी दिली. रविवारी 24 मे रोजी दुपारी तीन ते रात्री दहा कालावधीतील क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण येथे दाखवले जाणार आहे दुपारी साडेतीन वाजता मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स व सायंकाळी साडेसात वाजता दिल्ली कॅपिटल विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स या सामन्यांचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. इथे प्रवेश विनामूल्य आहे. नागरिकांना या माध्यमातून प्रत्यक्ष स्टेडियम सारखा अनुभव घेता येईल अशी माहितीही त्यांनी दिली. फॅन पार्कमध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत तसेच विविध करमणुकीचे व मनोरंजनाचे गेम्स  अनुभवता येतात. या फॅन पार्कचे आयोजन बीसीसीआयतर्फे करण्यात आले आहे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट संघटनेने  सहकार्य केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes