गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र पंदारे, उपाध्यक्षपदी विलासराव कुरणे
schedule07 Jul 26 person by visibility 11 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र पंदारे यांची तर उपाध्यक्षपदी विलासराव कुरणे यांची बिनविरोध निवड झाली. उपनिबंधक डॉक्टर प्रिया दळणर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडी झाल्या. रोहित बांदिवडेकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. मुख्य कार्यकारी अधिकारी रुपेश पाटोळे यांनी निवडीची रूपरेषा सांगितली. अध्यक्षपदासाठी पंदारे यांचे नाव संचालक मधुकर पाटील यांनी सुचवले. संचालक शशिकांत तिवले यांनी त्यास अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी कुरणे यांचे नाव संचालक अतुल जाधव यांनी सुचवले तर संचालक बांदिवडेकर यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदाकरिता प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने पंदारे व कुरणे यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. यावेळी बँकेचे संचालक रमेश घाटगे, सदानंद घाटगे, अजित पाटील, हेमा पाटील, मनोज रेणके, संजय खोत, किशोर पवार , अरविंद आयरे, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते .अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना रवींद्र पंदारे म्हणाले, " संचालक व सभासदांनी माझ्यावर जो विश्वास दाखवेल आहे तो सार्थ ठरवू. सर्व संचालकांना सोबत घेऊन बँकेच्या प्रगतीचा आलेख आणखी उंचावत नेऊ."