Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आता प्रशासक राजवट नाही –कामकाजात सदस्यांना विश्वासात घ्या, अध्यक्षांचे खडेबोल ! शिक्षणाधिकारी रजेवर !सहकार सप्ताहनिमित्त गोकुळमध्ये वृक्षारोपण, अधिकारी - कर्मचाऱ्यांसाठी व्याख्यानगोकुळची बदनामी थांबवा, शेतकरी कुटुंबांतील मुलगा करणार आत्मक्लेश आंदोलनप्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी बाबू धोंडीबा परीटअ‍ॅड. विवेकानंद घाटगे यांचा बुधवारी ग्रंथतुला करुन जाहीर सत्कारशिष्यवृत्ती परीक्षेत महापालिका शाळा ठरल्या जिल्ह्यात अव्वलदुग्धजन्य पदार्थांच्या मूल्यवर्धनासंबंधी संशोधन, डॉ. ज्ञानेश्वर पंतगे यांच्या संशोधनाला पेटंटमहाराष्ट्र न्यूज वनवर शुभेच्छांचा वर्षाव, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून दिवसभर सदिच्छा !भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन करवीर तालुकाध्यक्षपदी मन्सूर सय्यदबदलत्या मानसिकतेची नवी पहाट, उच्चशिक्षित इंजिनीअर मुलीने केले शेतकरी मुलासोबत लग्न !!

जाहिरात

 

आता प्रशासक राजवट नाही –कामकाजात सदस्यांना विश्वासात घ्या, अध्यक्षांचे खडेबोल ! शिक्षणाधिकारी रजेवर !

schedule06 Jul 26 person by visibility 73 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या कामकाजावरुन सर्वसाधारण सभा गाजली. अधिकाऱ्यांच्या कारभारावरुन जिल्हा परिषद सदस्यांनी प्रशासनला लक्ष्य केले.  हा विषय ताजा असताना पुन्हा एकदा प्राथमिक शिक्षण विभागाचा कामकाज चर्चेचा विषय ठरला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या कार्यालयात प्राथमिक शिक्षण विभागाशी निगडीत कामे, जिल्हा नियोजन समितीकडील निधी वाटप यासंबंधी चर्चा झाली. या बैठकीतही काही सदस्यांनी, शिक्षण विभागाच्या कामकाजावरुन पुन्हा एकदा चर्चा घडवून आणली. यावेळी अध्यक्षा खोत यांनी, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना उद्देशून, ‘जिल्हा परिषदेत आता प्रशासक राजवट नाही. लोकप्रतिनिधी आहेत. पदाधिकारी, सदस्य आहेत. त्यांना विश्वासात घेऊन कामकाज करा. ’अशा शब्दांत कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. काही दिवसापूर्वी, अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या बैठकीत शिक्षण समिती सभापती शितल यादव, व अन्य सदस्य उपस्थित होते.

दरम्यान शिक्षणाधिकारी मीना शेंडकर या सोमवार, सहा जुलैपासून दहा दिवस रजेवर गेले आहेत. प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी, सोमवारी शिक्षकांच्या विविध प्रश्नासंबंधी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन व प्राथमिक शिक्षणाधिकारी शेंडकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले होते. शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शिक्षणाधिकारी शेंडकर यांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्या रजेवर गेले असल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक शिक्षण विभागातंर्गत होत असलेल्या शिक्षक बदली, मुख्याध्यापक पदोन्नती, शाळा दुरुस्ती, नवीन इमारत या कामासंबंधी चर्चा करण्यासाठी अध्यक्ष खोत यांच्या दालनात नुकतीच बैठक झाली. शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल प्राथमिक शिक्षण विभागाचे कौतुकही झाले. शिक्षक वर्गाकडून घेत असलेल्या कष्टाविषयी गौरवोद्गार काढले. या बैठकीत, शिक्षण विभागाच्या निधी वाटपाचा विषय उपस्थित झाला. सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निधी वाटपाचे नियोजन होते याकडे सदस्यांनी लक्ष वेधले.

याविषयावरुन अध्यक्ष खोत यांनी, ‘जिल्हा परिषदेत आता प्रशासक राजवट नाही. लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. पदाधिकारी, सदस्य आहेत. परस्पर काही ठरवू नका. सदस्यांना विश्वासात घेऊनच कामे करावे लागतील.’असे सांगितले. प्रशासक कालावधीत सगळे अधिकार हे अधिकाऱ्यांना होते सगळे निर्णय तेच घेत, आता असा प्रकार चालणार नाही या शब्दांत अध्यक्ष खोत यांनी अधिकाऱ्यांना समज दिल्याचे सदस्यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes