Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एसआयआर प्रक्रियेत गंभीर त्रुटी, नोंदणीसाठी मुदतवाढ हवी : काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतली जिल्हा प्रशासनाची भेटगव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र पंदारे, उपाध्यक्षपदी विलासराव कुरणेआता प्रशासक राजवट नाही –कामकाजात सदस्यांना विश्वासात घ्या, अध्यक्षांचे खडेबोल ! शिक्षणाधिकारी रजेवर !सहकार सप्ताहनिमित्त गोकुळमध्ये वृक्षारोपण, अधिकारी - कर्मचाऱ्यांसाठी व्याख्यानगोकुळची बदनामी थांबवा, शेतकरी कुटुंबांतील मुलगा करणार आत्मक्लेश आंदोलनप्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी बाबू धोंडीबा परीटअ‍ॅड. विवेकानंद घाटगे यांचा बुधवारी ग्रंथतुला करुन जाहीर सत्कारशिष्यवृत्ती परीक्षेत महापालिका शाळा ठरल्या जिल्ह्यात अव्वलदुग्धजन्य पदार्थांच्या मूल्यवर्धनासंबंधी संशोधन, डॉ. ज्ञानेश्वर पंतगे यांच्या संशोधनाला पेटंटमहाराष्ट्र न्यूज वनवर शुभेच्छांचा वर्षाव, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून दिवसभर सदिच्छा !

जाहिरात

 

एसआयआर प्रक्रियेत गंभीर त्रुटी, नोंदणीसाठी मुदतवाढ हवी : काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतली जिल्हा प्रशासनाची भेट

schedule07 Jul 26 person by visibility 26 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : एसआयआर प्रक्रियेत गंभीर त्रुटी आहेत.शिवाय सध्या सर्वत्र पूरस्थिती आहे.तसेच पंढरीच्या वारीसाठी लाखो वारकरी जातात या साऱ्या स्थितीचा गांभीर्याने विचार करून एसआयआर प्रक्रियेतला मुदतवाढ मिळावी शिवाय या प्रक्रियेतील त्रुटी तातडीने दूर करावेत अशी मागणी कोल्हापूर शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी केली. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. ' सहा जुलै 2026 रोजी च्या सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 33 लाख 55 हजार 224 इतके मतदार आहेत त्यापैकी केवळ 53 हजार 941 ईएफ फार्म्सची पडताळणी झाली आहे. तर पाच लाख 32 हजार 703 मतदार अद्याप पडताळणी  प्रक्रियेपासून लांब आहेत आहेत. दरम्यान एकही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहता कामा नये हेच काँग्रेसची भूमिका आहे ,असे शिष्टमंडळाने  प्रशासनासमोर स्पष्ट केले .     काँग्रेस पक्षाने मागण्यांचे निवेदने दिले यामध्ये, ' इ एफ फॉर्म भरण्यासाठी दिलेली  मुदत अपुरी असून ती तातडीने वाढवावी.  बीएलओ पूर्णवेळ या कामासाठी नियुक्त करावे. प्रत्येक तालुक्यात पुनर्प्रशिक्षण व तांत्रिक सहायता केंद्र सुरू करावे. सर्व बीएलओना अधिकृत फोटो ओळखपत्र तातडीने द्यावेत.  प्रत्येक ग्रामपंचायत , नगरपालिका व महापालिका मध्ये एसआयआर सहाय्यता केंद्र सुरू करावे.  नागरिकांसाठी व्यापक जनजागृती मोहीम प्रभावी राबवावी' अशा मागण्या करण्यात आल्या. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते व नगरसेवक राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक राहुल माने, अमर समर्थ, प्रशांत खेडकर, सचिन चौगुले,  सचिन शेंडे, रोहित कवाळे, माजी नगरसेवक तौफिक मुलानी, अजित पवार धामोडकर, संपतराव चव्हाण पाटील, वेदवती मोहिते, पुष्कराज देशपांडे, ऋषिकेश पाटील, संतोष जरग, सचिन बिरंजे, मोहसीन मुल्ला आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
 काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर यांनी,  एसआय'आर प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत. यामुळे लोकांना अडचण निर्माण होत आहेत . ही प्रक्रिया सुरळीत झाली नाही तर अनेक मतदार मतदानापासून वंचित राहतील. मुळात या मोहिमेविषयी व्यापक प्रमाणात प्रसिद्धी झाली नाही. त्यामुळे असंख्य नागरिक एस आय आर प्रक्रियेपासून अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे. तेव्हा ईएफ फॉर्म भरण्यासाठी दिलेली   मुदत वाढविण्याची गरज आहे. ' हे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणले.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर म्हणाले , ' प्रत्येक नागरिकाच्या मतदानाचा हक्क अबाधित राहिला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रशासनाने घाईगडबडीत प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी प्रत्येक पात्र मतदाराचे नाव सुरक्षित राहील याला प्राधान्य द्यावे.मुळात या मोहिमेची व्यापक आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झाली नाही.शिवाय ही प्रक्रिया पूर्ण करताना मतदारांना  संशयाच्या भोवर्‍यात उभे केले जाते हे चुकीचे आहे. दहा - दहा वेळा पुरावे का मागत आहेत' अशी विचारणा केली. वेदवती मोहिते म्हणाल्या, ' सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे एसआर प्रक्रियेचे काम पूर्ण क्षमतेने होणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी या प्रक्रियेत ज्या त्रुटी आहेत त्यामध्ये तातडीने सुधारणा कराव्यात. शिवाय या कालावधीत वारकरी मोठ्या संख्येने वारीमध्ये सहभागी होतात, त्यांची नोंदणी कशी होणार ? " असा सवाल  केला. निवासी उपजिल्हाधिकारी गुरुव  यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या पर्यंत पोहोचविले जाईल अशी ग्वाही दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes