Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
३१ मेपर्यंत थकबाकी भरा, अन्यथा एक जूनपासून दुकानगाळे सील - आयुक्‍त राजेंद्र भारुड कुलगुरुपदासाठी चौदा मे रोजी अंतिम मुलाखती ! डॉ. पी. एस. पाटील, आर. के. कामत, ज्योती जाधव यांचा समावेश !!आनंदोत्सव शिक्षण विभागाने देशात अव्वल स्थान पटकाविल्याचा…संकल्प उत्कर्ष श्रेणी प्राप्तीचाभारतीय जनरल कामगार सेनेतर्फे निदर्शने, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरदमसाचे पुरस्कार जाहीर, 24 मे रोजी पुरस्कार वितरण समारंभ शाहू महाराज हायस्कूलचा दहावीचा निकाल ९७.९८ टक्केफुटबॉलपटूनी चषक जिंकला… अॅक्टिव्हा बक्षीस देऊन होणार गौरवम्युझिकल फाऊटेंनच्या कामात कोणतीही तडजोड नको : आमदार राजेश क्षीरसागरजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कामगिरी भारी, शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीत देशात प्रथम क्रमांक वूलू स्वच्छतागृह ठरणार महिला भाविकांसाठी आधारवड ! मातृदिनी भाजपची कोल्हापूरकरांना अनोखी भेट! !

जाहिरात

 

आनंदोत्सव शिक्षण विभागाने देशात अव्वल स्थान पटकाविल्याचा…संकल्प उत्कर्ष श्रेणी प्राप्तीचा

schedule11 May 26 person by visibility 40 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : शालेय शिक्षण साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या २०२४-२५ च्या शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर जिल्हा परिषदेला देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला. यानिमित्त जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राजर्षी शाहू सभागृह येथे आयोजित या आनंदोत्सव सोहळयात पदाधिकारी, अधिकारी आणि सदस्य सहभागी झाले. शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. अधिकारी कर्मचाऱ्यांना साखर पेढे वाटून अभिनंदन केले. कोल्हापूर जिल्हा उत्तम दोन या श्रेणीत आहे. या श्रेणीवर समाधान न मानता उत्कर्ष श्रेणी प्राप्त करण्यासाठी सूक्ष्म नियोजन व कालबद्ध कार्यक्रम आखणीचा संकल्पही करण्यात आला.

जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, सभापती सारिका नांदेकर, शिक्षण समिती सभापती शितल यादव, महिला व बालकल्याण समिती  सभापती  विद्या पाटील, सभापती श्रद्धा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन यांनी, शिक्षण विभागाचे कौतुक करत भविष्यकाळात शैक्षणिक गुणवत्ता वाढविताना जिल्हा परिषदेच्या शाळेचा लौकिक वाढवू. अधिकाधिक मुले जिल्हा परिषद शाळेत दाखल होतील यासाठी प्रयत्न करू या.’असे आवाहन केले. उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी, ‘शिक्षण विभागाची कामगिरी ऐतिहासिक आहे.’अशा शब्दांत कौतुकोदगार काढले. बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर यांनी शिक्षक हा केवळ शिकवण्याचे काम करत नाही तर तो समाज घडवित असतो असे सांगितले.

शिक्षण समिती सभापती शितल यादव यांनी कोल्हापूर जिल्ह्याने मिळवलेले यश हे संपूर्ण शिक्षण विभागासाठी अभिमानास्पद आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगितले. शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी या उपक्रमाची माहिती दिली. शिक्षण विभागाने योग्य नियोजन, साऱ्यांचे सहकार्य यामुळे हे यश मिळाल्याचे नमूद केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रभावी नियोजन, डिजिटल शिक्षणाचा वापर, सातत्यपूर्ण मूल्यांकन आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रम यांच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्याने देशात अव्वल स्थान मिळाल्याचे सांगितले. याप्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत उपस्थित होते. डाएटचे वरिष्ठ व्याख्याते डॉ. भोई यांनी आभार मानले. शिक्षक संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes