Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भारतीय जनरल कामगार सेनेतर्फे निदर्शने, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरदमसाचे पुरस्कार जाहीर, 24 मे रोजी पुरस्कार वितरण समारंभ शाहू महाराज हायस्कूलचा दहावीचा निकाल ९७.९८ टक्केफुटबॉलपटूनी चषक जिंकला… अॅक्टिव्हा बक्षीस देऊन होणार गौरवम्युझिकल फाऊटेंनच्या कामात कोणतीही तडजोड नको : आमदार राजेश क्षीरसागरजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कामगिरी भारी, शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीत देशात प्रथम क्रमांक वूलू स्वच्छतागृह ठरणार महिला भाविकांसाठी आधारवड ! मातृदिनी भाजपची कोल्हापूरकरांना अनोखी भेट! !शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी एस. व्ही. पाटील, उपाध्यक्षपदी गजानन कांबळे डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या स्वप्नील अलंगे यांची बीआयएसएजी-एनमध्ये निवडकोल्हापुरात महिलांच्यासाठी सर्व सुविधायुक्त वातानुकूलित स्वच्छतागृहे ! रविवारी होणार लोकार्पण !!

जाहिरात

 

भारतीय जनरल कामगार सेनेतर्फे निदर्शने, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

schedule11 May 26 person by visibility 24 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  कोल्हापूर शहरालगतच्या औद्योगिक वसाहतीत  गेल्या दोन महिन्यात ४ ते ५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कामगारांच्या सुरक्षेतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडून कामगारांच्या सुरक्षिततेचा अक्षरशः फज्जा उडाला आहे. कर्मचाऱ्यांच्या मृत्यू प्रकरणी संबंधित कंपन्यावर कारवाई करावी अन्यथा  औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या जिल्हा अध्यक्ष राजू सांगावकर यांनी दिला. या विभााच्या कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केले.
शिवसेना ठाकरे पक्षाच जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले की, कामगारांच्या वाढत्या मृत्यू प्रश्‍नी आपणास जर कारवाई करण्यास जमत नसेल तर, आपल्या विरोधात आमच्या कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष न्यायालयात जातील असा इशारा इंगवले यांनी दिला.
 जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले, ‘कामगारांच्या सुरक्षेसाठी स्वतः कारखान्यांमध्ये जाऊन भेट देऊन कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते का हे तपासा.’अशी सूचना केली.औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग सहसंचालक अभिती अवसरे यांना निवेदन देण्यात आले.. यावेळी संभाजी भोकरे, राजू जाधव, हर्षल पाटील, सागर साळुंखे, मोनापा चौगुले, आप्पा कांबळे,  आनंदा शिंदे, दीपक गौड, बाळासाहेब नलवडे. अजित चव्हाण आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes