Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दमसाचे पुरस्कार जाहीर, 24 मे रोजी पुरस्कार वितरण समारंभ शाहू महाराज हायस्कूलचा दहावीचा निकाल ९७.९८ टक्केफुटबॉलपटूनी चषक जिंकला… अॅक्टिव्हा बक्षीस देऊन होणार गौरवम्युझिकल फाऊटेंनच्या कामात कोणतीही तडजोड नको : आमदार राजेश क्षीरसागरजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कामगिरी भारी, शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीत देशात प्रथम क्रमांक वूलू स्वच्छतागृह ठरणार महिला भाविकांसाठी आधारवड ! मातृदिनी भाजपची कोल्हापूरकरांना अनोखी भेट! !शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी एस. व्ही. पाटील, उपाध्यक्षपदी गजानन कांबळे डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या स्वप्नील अलंगे यांची बीआयएसएजी-एनमध्ये निवडकोल्हापुरात महिलांच्यासाठी सर्व सुविधायुक्त वातानुकूलित स्वच्छतागृहे ! रविवारी होणार लोकार्पण !! खडके अकॅडमी बोरपाडळेचा दहावीचा सलग अकराव्या वर्षी शंभर टक्के निकाल

जाहिरात

 

दमसाचे पुरस्कार जाहीर, 24 मे रोजी पुरस्कार वितरण समारंभ

schedule11 May 26 person by visibility 107 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी   : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने देण्यात येणाऱ्या २०२५   मधील ग्रंथ पुरस्कारासाठी रवींद्र ठाकूर, धनंजय बिजले, शशिकांत चौधरी, निलांबरी कुलकर्णी , चंद्रकांत बाबर, महानंदा मोहिते आदींच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे.  २४ मे  २०२६ रोजी पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.                                    
पुरस्कार प्राप्त पुस्तके आणि लेखकांची नावे अशी- देवदत्त पाटील पुरस्कार ( कादंबरी) विभागून -धरणीमाय- शशिकांत चौधरी, भिंगुळवाणे दिवस -रमेश साळुंखे. शंकर खंडू पाटील पुरस्कार: स्त्रीप्रधान सर्वेपि सुखिन सन्तु – निलांबरी कुलकर्णी   (कथासंग्रह). अण्णा भाऊ साठे पुरस्कार: दाही दिशा -रवींद्र ठाकूर ( कादंबरी). कृ.गो.सूर्यवंशी पुरस्कार: महामुद्रा- धनंजय बिजले ( संकीर्ण). शैला सायनाकर पुरस्कार:  माझ्यातल्या कवितेची हळूहळू होऊ लागली आहे वाफ-चंद्रकांत बाबर  (कवितासंग्रह). चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन)- घुंगुरमाळा- महानंदा मोहिते. बालवाड्मय पुरस्कार-  श्री संवाद-श्रीयांश हराडे. 
विशेष पुरस्कार : ऋजुता माने पुरस्कार – थिजलेल्या माणुसकीचा गहिवर- सोनिया पाटील. कर्तृत्वाचा एक शोध,-रवींद्र बेडकीहाळ. गुलामी जिणं -रमेश जावीर. जगाचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज- मधुकर जाधव. चलबट - अर्जुन व्हटकर. राजधुरंदर ताराराणी -राजेंद्र घाडगे. अर्थतरंग -संजय ठिगळे. कोलाहालची क्षणचित्रे -लवकुमार मुळे. फक्कड, सचिन अवघडे. घनघोर काळीजभर -रवी बावडेकर. तू ही गोष्ट सांगायला नको होती - सुनील साळुंके. वंचितांचे राजकारण एक मुक्त चिंतन -सिद्धार्थ कांबळे. मी चंदन व्हाया बघतो - सुधाकर इनामदार. स्त्री क्षेत्र ऋतुक्षेत्र अम्बुबीजानाम्- दिपाली घाडगे. अंतरंग शब्दाचे - संजय वारके.  निळी सावळी नव्हाळी-स्वाती पाटील. सायतारे - प्रकाश कुलकर्णी. काठावरच्या चेह-यांच्या कथा - सुरज चौगुले. महात्मा बसवेश्वर आणि संत ज्ञानेश्वर यांचे सामाजिक चिंतन - चारुदत्त कासार 
 दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कोल्हापूर ,सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांसह सीमाभागातील मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. २०२५  या वर्षातील ग्रंथ पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून भीमराव धुळूबुळू, प्रा. दि. बा.पाटील, गौरी भोगले, पाटलोबा पाटील  यांनी काम पाहिले.
    पुरस्कार वितरण समारंभ रविवार २४ मे २०२६  रोजी सकाळी १०.३० वाजता शेठ रामभाई सामाणी स्मृती हॉल, शिवाजी उद्यमनगर  येथे मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे दमसाचे  कार्यवाह डॉ.विनोद कांबळे यांनी कळविले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes