रंगकर्मीनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजेश क्षीरसागरांचे आभार
schedule01 Oct 24 person by visibility 262 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल व त्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे कोल्हापुरातील रंगकर्मीनी आभार मानले.
राज्य सरकारने नाट्यगृहासाठी २५ कोटी निधी मंजूर केल्याबदल रंगकर्मी, कलाकार, कलाप्रेमी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृह परिसरात आनंदोत्सव साजरा केला. शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व आहे असे सांगितले. प्रसाद जमदग्नी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रंगकर्मी, कलाकारांच्या भावना तत्परतेने जाणून घेतल्या. कोल्हापूरच्या या अस्मितेबाबत शासनाने जलदगतीने सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या. यामध्ये राजेश क्षीरसागर यांनी अग्रक्रमाने पाठपुरावा करून निधी मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले. जिल्हा प्रशासनासह महापालिका प्रशासनानेही कार्यतत्परता दाखवली . आता नाट्यगृह मूळ स्वरूपात उभे राहावे.’
रंगकर्मी राष्ट्रीय पुरस्कार विजेते सागर बगाडे यांनी, निधी मंजुरीबाबत आभार मानत या घटनेत ज्या व्यावसायिकांच्या साहित्याचे नुकसान झाले होते त्यांना तात्काळ ५ लाखांची मदत करून दिलासा दिल्याबद्दल राजेश क्षीरसागर यांचे विशेष आभार मानले. यावेळी सुनिल घोरपडे, रोहन घोरपडे, किरणसिंह चव्हाण, सागर वासुदेवन, शिवाजी पाटील, सुनिल मुसळे, शिवसेनेचे रमेश खाडे, किशोर घाटगे, सुनील जाधव, रणजीत मंडलिक, अंकुश निपाणीकर, पूजा भोर, अमरजा पाटील, पूजा कामते, पूजा आरदांडे, सचिन पाटील, किरण पाटील, श्रीकांत मंडलिक, रियाज बागवान, कपिल नाळे, प्रशांत साळुंखे, अमित चव्हाण, शेखर जाधव, किरण अतिग्रे, अविनाश कामते उपस्थित होते.