Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लघु-मध्यम स्केल इंडस्ट्रीला प्रोत्साहित केल्यास नवीन उद्योजक घडतील – माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभूशाहूपुरीत भगवा झंझावात, प्रकाश नाईकनवरे, नीलिमा पाटील यांची जंगी रॅलीजिल्हा परिषदेसाठी पाच फेब्रुवारीला मतदान ! मतमोजणी सात फेब्रुवारीला !!प्रभाग क्रमांक अकरामध्ये भगवे वातावरण ! महायुतीचे शक्तीप्रदर्शन, रॅलीत हजारोंचा सहभाग ! !दमसातर्फे पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहनजिल्हा परिषदेच्या निवडणुकींची आज दुपारी घोषणासत्तेचा मुकुट नव्हे तर माझ्यासाठी जनतेचे प्रेम महत्वाचे – आमदार सतेज पाटीलजनतेच्या विश्वासाच्या लाटेवर सत्यजित जाधवांचा विजय निश्चित - डॉ. दश्मिता जाधव देवेंद्र फडणवीसांची राजेश क्षीरसागरांच्या निवासस्थानी भेट हद्दवाढीमुळेच शहराचा विस्तार- विकास, कोल्हापुरात औद्योगिक इको सिस्टीम- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत शिक्षक सचिन देसाई प्रथम

schedule26 Sep 24 person by visibility 606 categoryशैक्षणिक

*शासनाच्या दर्जेदार *
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिक्षकांमध्ये  निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावरील शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी 'राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती' या खुल्या व अभिनव स्पर्धेचे आयोजन केल होते.  राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडूनआयोजित या स्पर्धेत भुदरगड तालुक्यातील विद्या मंदिर नाधवडे  येथील उपक्रमशील शिक्षक सचिन देसाई यांनी इयत्ता ६ ते ८ समाजशास्त्र विषय गटातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. 
या पुरस्काराचे वितरण रविवारी २९ सप्टेंबर रोजी मान्यवारांच्या उपस्थितीत पुणे येथे होणारआह. रोख रुपये ५० हजार व प्रमाणपत्र असे बक्षीसाचे स्वरुप असणार आहे.पुरस्कार विजेते शिक्षक सचिन देसाई यांचे दीक्षा साहित्य निर्मितीतही महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांच्या स्वनिर्मित 'स्मार्ट एज्युकेशन' या शैक्षणिक यू टयूब चॅनेलला सुद्धा राज्यभरातून विक्रमी प्रतिसाद लाभला आहे. या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर,डॉ.एकनाथ आंबोकर,डायट प्राचार्य राजेंद्र भोई, गटविकास अधिकारी डॉ शेखर जाधव, गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, विस्ताराधिकारी प्रबोध कांबळे, उत्तमराव पाटील, केंद्रप्रमुख डी डी पाटील यांनी अभिनंदन केले. 
 शालेय शिक्षण विभागातर्फे आयोजित या स्पर्धेत अध्यापक विद्यालयासह पहिली ते १२ वी पर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना सहभाग घेण्यास आवाहन केले होते. इयत्ता व विषयनिहाय विशेष गट करुन यामध्ये तालुकास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत बक्षीसे होती. स्पर्धेची कार्यवाही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेकडून पूर्ण झाली.  राज्यस्तर विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांची यादी घोषित करण्यात आली आहे.
अध्यापनात रंजकता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,कॉपीराईट कायद्याचे पालन, सरकारी धोरणाशी सुसंगता, विषयाची मांडणी,सादरीकरण, व कल्पकता या निकषांच्या आधारे दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओचे परीक्षण करण्यात आले. राज्यस्तरावर यश संपादन करणाऱ्या ८४ शिक्षकांचा गौरव केला जाणार आहे. या स्पर्धेत राजतील हजारो शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. यातील उत्कृष्ट ठरलेले सर्व ई-साहित्य सरकारच्या वेबसाइडवर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. 
        

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes