Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
णण णणजिल्हा परिषदेची सत्ता लाडक्या बहिणींच्या हाती ! सहापैकी पाच पदावर महिला !!-शिक्षक पात्रता परीक्षा एकवीस जूनला, आवेदनपत्र भरण्याची मुदत सोळा एप्रिलपर्यंतआयटी. पार्कच्या जागा हस्तांतरणाचा मार्ग सुकर, औद्योगिक विकास महामंडळाने भरले ५ कोटी ६० लाखनिलंबित कर्मचाऱ्यांच्यावर लाखो रुपयांचा खर्च, महापालिका त्यांना फुकट का पोसते ? नगरसेवकांचा सभागृहाला सवालजिप समिती सभापतिपदासाठी नावे घोषित ! सारिका नांदेकर, शीतल यादव विद्या पाटील, श्रद्धा गायकवाड !!पाटाकडील तालीम मंडळाने जिंकली चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा ! खंडोबा तालीम मंडळ उपविजेता !!कोल्हापूर-नवी मुंबई ! इंडिगो एअरलाईन्सची दिवसातून दोन वेळा विमान सेवा !!निरोगी आरोग्यासाठी होमिओपॅथीसुध्दा सक्षम पर्याय - डॉ. धर्मेंद्र शर्मा संचालक म्हणून आम्ही प्राथमिक दूध संस्थांच्या पाठीशी, अदृश्य शक्तीचा डाव उधळून लावू- नविद मुश्रीफ

जाहिरात

 

शिक्षक पात्रता परीक्षा एकवीस जूनला, आवेदनपत्र भरण्याची मुदत सोळा एप्रिलपर्यंत

schedule30 Mar 26 person by visibility 35 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET)- २०२६ परीक्षा २१ जून २०२६ रोजी होणार आहे. या परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया २७ मार्चपासून सुरु आहे. येत्या सोळा एप्रिल २०२६ पर्यंत परीक्षार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदनपत्र भरता येतील, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चौथे यांनी कळविले आहे.

इयत्ता पहिली ते  पाचवी (पेपर १) व इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी (पेपर २) साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व सरकारी निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. सर्व संबंधित परीक्षार्थ्यांनी या संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. 

ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी २७ मार्च ते सोळा एप्रिल २०२६ असा आहे. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे ९ ते २१ जून २०२६, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I, रविवारी २१ जून रोजी वेळ सकाळी १०.३० ते दुपारी एक वाजेपर्यंत आहे.  शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II,याच दिवशी दुपारी २.३० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे. परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल याची  नोंद घ्यावी असे म्हटले आहे.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes