Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळसाठी महायुतीच्या नेत्यांचे ठरले ! छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी जाहीर!!राज्याला आदर्शवत भाडेदराचे रोल मॉडेल तयार करा : आमदार राजेश क्षीरसागरसोशल मीडियावर गोकुळची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, कर्मचाऱ्यांची मागणी महापालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून ७० कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नतीआयकर कायदा २०२५ च्या नव्या पर्वाचे ‘पुनर्मंथन’ कोल्हापुरात, शनिवारी - रविवारी राष्ट्रीय परिषदराष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी टास्क फोर्सची स्थापना, नऊ सदस्यीय समितीत कुलगुरू डॉ. आर. के. कामतचप्पल निर्मितीची प्रक्रिया उलगडणाऱ्या ‘द कोल्हापुरी’ पुस्तकाला अकरा पुरस्कार मेघराज भोसले यांच्या समर्थ पॅनेल विरोधात चित्रकर्मी पॅनेल, अपक्षांची संख्याही मोठी मंत्री चंद्रकांत पाटलांची संकल्पना, कोल्हापुरात हितैषी कौन्सिलिंग सेंटरची स्थापनानिर्माता गटात आठ, दिग्दर्शक गटातून नऊ उमेदवार ! अभिनेता गटात पाच जणांमध्ये लढत ! !

जाहिरात

 

पाटाकडील तालीम मंडळाने जिंकली चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा ! खंडोबा तालीम मंडळ उपविजेता !!

schedule29 Mar 26 person by visibility 220 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : अतिशय चुरशीच्या सामन्यांमध्ये पाटाकडील तालीम मंडळ संघाने खंडोबा तालीम मंडळ संघावर एक विरुद्ध शून्य  गोलफरकाने विजय मिळवून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली. येथील शाहू स्टेडियम येथे रविवारी अंतिम सामना झाला श्री बालगोपाल तालीम मंडळ प्रायोजित या स्पर्धेसाठी फुटबॉल स्पर्धेसाठी फुटबॉल शौकीनानी  प्रचंड गर्दी केली होती. पाटाकडील तालीम मंडळाकडून फुटबॉलपटू अमीन खजीरने विजयी गोल नोंदवला. सामन्याच्या उत्तरार्धात 80 व्या मिनिटाला फुटबॉलपटू नवी खानच्या पासवर त्यांनी हा गोल केला.
दरम्यान शिवसेनेच्या उपनेते व माजी आमदार जयश्री जाधव, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, उपमहापौर अक्षय जरग, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, नगरसेवक वैभव माने, विजय खाडे पाटील, रत्नेश शिरोळकर, इस्माईल  बागवान, बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कुरणे, कार्याध्यक्ष निवास शिंदे, आप्पासाहेब साळोखे, व्यावसायिक जयेश ओसवाल, ओंकार जाधव, अश्फाक आजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बक्षीस समारंभ झाला. विजेत्या संघाला दोन लाख 31 हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित केले. अंतिम सामन्यातील सामनावीर म्हणून पाटाकडील तालीम मंडळाचा खेळाडू ओंकार मोरे हा ठरला. पाटाकडीलचा अक्षय पायमल हा बेस्ट डिफेन्स खेळाडू ठरला. स्पर्धेतील बेस्ट हाफ खेळाडू खंडोबा तालीम मंडळाचा रघु पवार ठरला. खंडोबा तालीमंडळाचा खेळाडू विष्णू टी एम हा बेस्ट फॉरवर्ड खेळाडू ठरला. स्पर्धेतील मालिकावीर म्हणून पाटाकडील तालीम मंडळाचा खेळाडू अमिन खजीर यांना गौरविण्यात आले. उपविजेता संघ खंडोबा तालीम मंडळाला एक लाख 31 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. दरम्यान अंतिम सामन्याचे उद्घाटन पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes