टीडीएफ, माध्यमिक शिक्षक संघ, विवेकानंद संस्थेतर्फे रविवारी पुरस्कार वितरण समारंभ
schedule12 Sep 26 person by visibility 11 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक लोकशाही (टीडीएफ), कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, ( १३ सप्टेंबर २०२६) जिल्हास्तरीय आदर्श संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक पुरस्कार समारंभ आयोजित केला आहे. विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे सकाळी ११.३० वाजता कार्यक्रम होणार आहे. खासदार धनंजय महाडिक, विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे व महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जी. के. थोरात यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, संस्थेचे कोल्हापूर विभागप्रमुख श्रीराम साळुंखे, टीडीएफचे प्रदेश सचिव के. एस. ढोमसे, माध्यमिक शिक्षण संघाचे पुणे विभाग अध्यक्ष सुरेश खोत, टीडीएफचे मार्गदर्शन बी. डी. पाटील, टीडीएफचे पुणे विभाग अध्यक्ष शिवाजी कामथे, राज्य समन्वयक बी. एस. खामकर, टीडीएफचे कोल्हापूर महानगर अध्यक्ष संजय चोरमारे हे प्रमुख पाहुणे आहेत.