विधी परीक्षेत धन्वंतरी पाटील शिवाजी विद्यापीठात प्रथम
schedule12 Sep 26 person by visibility 14 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :येथील शहाजी लॉ कॉलेजची विद्यार्थिनी व माजी नगरसेवक शशिकांत धोंडीराम पाटील यांची कन्या धन्वंतरी पाटील यांनी पाच वर्षाच्या विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकाविला.प्राचार्य डॉ. प्रविण पाटील, डॉ. सविता रासम, डॉ. मौला शेख, डॉ. सुचिता सुरधीहल्ली, डॉ. अस्मिता पाटील, आई, ज्योत्स्ना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यापीठात प्रथम आल्याबद्दल धन्वंतरी पाटील विविध पारितोषिकांची मानकरी ठरली आहे. यामध्ये प्रिन्सिपल अॅड. नानासाहेब नांद्रेकर प्राईज, सांगली येथील अॅड. दत्तात्रय नारायण कुलकर्णी स्मृती पुरस्कार, नारायणदास सर्वोत्तमदास सोटी स्मृती पारितोषिक व अॅड. अरविंद सी शहा स्मृती पारितोषिक, न्यू पॅलेस सेवा सोसायटी पारितोषिकांचा समावेश आहे.