Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेने केली पाणीपट्टीत वाढ, एक ऑक्टोबरपासून अंमलबजावणीजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालकपदी प्रकाश पाटीलरानभाजी महोत्सवला जोरदार प्रतिसाद, दिवसभरात एक लाखाहून अधिक उलाढाल गोकुळसाठी 18 ऑक्टोबरला मतदान, 19 ऑक्टोबरला मतमोजणीगोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होणारकल्पनेपासून उद्योगापर्यंत -नवउद्योजकांना उद्योगनिर्मितीची दिशाजिल्ह्यात चला शाळेत जाऊया अभियान, नोडल अधिकाऱ्याची नेमणूकजिप कर्मचारी सोसायटीतील अभ्यासिका - ग्रंथालयाचा लाभ घेऊन सभासदाच्या पाल्यांनी प्रशासकीय सेवेत करिअर करावेशिवसेना नगरसेवकांनी घेतली जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट, कारवाई संदर्भात दिले निवेदनगोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी मोसमी चौगुले

जाहिरात

 

कोल्हापूर महापालिकेने केली पाणीपट्टीत वाढ, एक ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

schedule10 Sep 26 person by visibility 70 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेने एक ऑक्टोबर २०२६ पासून नवीन पाणीपट्टी वाढ जाहीर केली. पाणीपट्टी वाढ करताना एकूण सात टप्प्यात लागू होणार आहे. घरगुती व निवासी (फक्त १/२ इंची कनेक्शनकरिता)वापरसाठी शून्य ते वीस हजार लिटरपर्यंत प्रतिहजारी पंधरा रुपये इतका दर राहील. तर बिगर घरगुती व अनिवासी वापरसाठी वीस हजार लिटरपर्यत प्रतिहजारी ५८ रुपये तर औद्योगिक वापरासाठी वीस हजार लिटरपर्यंत प्रति  हजारी ९० रुपये इतकी सुधारित दरसूची जाहीर केली.

महापौर रुपाराणी निकम, आयुकत राजेंद्र भारुड यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भातील माहिती दिली. पाणीपट्टीच्या नवीन दरसूचीमुळे तीस कोटीपर्यंत उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. ही सगळी रक्कम पाणी पुरवठा वितरणासाठीच खर्ची केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थायी समिती व महापालिका सभेत पाणीपट्टी दरवाढीसंबंधी चर्चा झाली होती. प्रशासनाने सुचविलेली दरवाढ अमान्य करण्यात आली. त्यानंतर पदाधिकारी व अधिकारी यांनी संयुक्तपणे चर्चा करत सुधारित दरसूचनी केली आहे. महापौर निकम म्हणाल्या, ‘शहरवासियांवर जादा आर्थिक बोजा पडणार नाही याची काळजी घेत सुधारित दरसूची निश्चित केली.’ याप्रसंगी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेते मुरलीधर जाधव, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक आशकिन आजरेकर, जल अभियंता हर्षजीत घाटगे उपस्थित होते.

दरम्यान घरगुती, बिगर घरगुती व औद्योगिक वापरसाठी सुधारित दरसूची येत्या ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. सुधारित दरसूचीप्रमाणे वीस हजार एक लिटर ते तीस हजार लिटर वापरापर्यंत घरगुतीसाठी प्रतिहजार लिटरसाठी २० रुपये, बिगर घरगुती व अनिवासी वापरसाठी ५८ रुपये तर औद्योगिक वापरसाठी ९० रुपये प्रति हजारसाठी इतका दर निश्चित केला.

तीस हजार एक लिटर ते ४० हजार लिटरपर्यंत घरगुती वापरसाठी प्रति हजारसाठी २२ रुपये इतका दर आहे. तर बिगर घरगुती व औद्योगिक वापरासाठी प्रति हजारसाठी प्रत्येकी ५८ व ९० रुपये दर राहील. चाळीस हजार एक लिटर ते साठ हजार लिटरपर्यंत घरगुती वापरसाठी एक हजार लिटरसाठी २६ रुपये दर आहे. बिगर घरगुती व अनिवासी वापरसाठी एक हजार लिटरसाठी ६५ रुपये तर औद्योगिक वापरासाठी प्रति हजार लिटरसाठी ९४ रुपये दर निश्चित केला आहे.

साठ हजार एक लिटर ते ८० हजार लिटर पाणी घरगुती वापरकरिता प्रति हजार लिटरसाठी तीस रुपये तर बिगर घरगुती व अनिवासी वापरकरिता प्रति हजार लिटरसाठी ६५ रुपये तर औद्योगिक वापरासाठी प्रति हजार ९४ रुपये इतकी पाणीपटटी असेल. ८०,००१ लिटर ते एक लाख लिटर पाणी वापर अंतर्गत घरगुती व निवासी वापरसाठी प्रति हजार लिटरसाठी  ३६ रुपये इतका दर राहील. बिगर घरगुती व अनिवासी वापरसाठी प्रति हजार लिटरसाठी ७० रुपये तर औद्योगिक वापरासाठी प्रति हजार लिटर पाण्यासाठी ११२ रुपये दर निश्चित केला आहे.

एक लाख लिटरवरील पाणी वापर अतंर्गत घरगुती व निवासी वापरासाठी प्रति हजार लिटरपाण्यासाठी ३६ रुपये तर बिगर घरगुती व अनिवासी वापरसाठी प्रति हजार लिटरसाठी ७० रुपये दर आहे. तर औद्योगिक वापरसाठी प्रति हजार लिटरसाठी ११२ रुपये इतकी पाणीपट्टी घोषित केली आहे. बिगर घरगुती व अनिवासी वापर वर्गवारीमध्ये  व्यापारी संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासकीय रुग्णालय, शैक्षणिक संस्था, खासगी व्यावसायिक संस्था, खासगी क्लिनिक, दवाखाने, मंगल कार्यालये, धर्मादाय संस्थांचा समावेश आहे. औद्योगिक वापरमध्ये पाण्याचा  वापर व्यवसायकरिता करणाऱ्या संस्था, फॅक्टरी, रेस्टॉरेंटस, हॉटेल, खानावळ, कोल्ड्रिक्स हाऊस, रसवंतीगृह, सर्व प्रकारचे खासगी रुग्णालये (आंतररुग्ण), लॉजिग बोर्डिंग, यात्रीनिवास, बर्फाचे कारखाने, रेल्वे, बसस्थानक, बांधकाम वापरचा समावेश आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes