Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
समाजजीवनाशी एकरुप झालेले व्यक्तिमत्व, नैतिकता सांभाळणारे राजकारणीकोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात भरगच्च कार्यक्रमशाहूवाडी तालुक्यात एमआयडीसाठी हालचाली ! पंधरा दिवसात प्रस्ताव सादर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना !!टोप-संभापूर औद्योगिक वसाहतीत उद्योजकांनी उद्योग उभारणीला प्राधान्य द्या-माजी आमदार जयश्री जाधव प्रभाकरपंत कोरगांवकर हे समाज परिवर्तनाचे माध्यम होते-प्राचार्य ईस्माइल पठाण कसबा बावडा - लाईन बझार परिसरात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई कराडेप्युटी सीईओ ओमप्रकाश यादवांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीरकेडीसीसीच्या संचालकांची लंडन हाऊसला भेट ! हा आयुष्यातील आनंदाचा दिवस -हसन मुश्रीफपी.एस. घाटगे यांचा खासगी शिक्षक महासंघात प्रवेश ! राज्य प्रवक्तापदी निवड !!प्रख्यात अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांचे निधन

जाहिरात

 

सीएमपदासाठी भाजपाला पाठिंबा, मोदी-शाहांच्या निर्णयाला समर्थन: एकनाथ शिंदे

schedule27 Nov 24 person by visibility 849 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “सत्तास्थापण्यात आमच्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. कसलीही कोंडी निर्माण होणार नाही. स्पीडब्रेकर तयार होणार नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचे समर्थन असेल. भारतीय जनता पक्षाचा, महायुतीचा जो मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असेल त्याला पाठिंबा राहील.”अशी स्पष्ट भूमिका काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. यासंबंधी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह यांना मंगळवारी फोन करुन सांगितल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शिंदे यांनी,‘नाराज होऊन आम्ही रडणारे नाही, तर लढणारे कार्यकर्ते आहोत. अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी प्रचंड काम करता आले. यामुळे मी समाधानी आहे, खूश आहे. आनंदी आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशी ओळख निर्माण झाली, ही ओळख कोणत्याही पदापेक्षा मोठी आहे. राज्यात मोठया प्रमाणात विकासकामे केल्यामुळे आमच्यावर मतांचा वर्षाव झाला. विकास व कल्याणकारी योजनांची सांगड घालून काम केले. निवडणुकीच्या काळात मी जवळपास ९० सभा घेतल्या. मुख्यमंत्री नव्हे तर कॉमन मॅन म्हणून जनतेसाठी काम केले लोकांच्या करता सदैव उपलब्ध राहिलो. कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता आहे उद्याही कार्यकर्ता राहणार. निवडणुकीच्या काळात पायालाला भिंगरी बांधून सगळा महाराष्ट्र पिंजून काढला. महायुतीतील प्रत्येक घटक, नेता हे विजयासाठी लढले.’

शिंदे म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी  व शाह हे माझ्यापाठीमागे पहाडासारखे उभे राहिले. राज्यासाठी काम करण्याकरिता पाठबळ दिले. राज्यातील प्रत्येक घटकासाठी योजना राबविल्या. महिला, शेतकरी, तरुण, ज्येष्ठ या प्रत्येकासाठी योजना राबविल्या. शेती, सिंचनसाठी काम केले. महाविकास आघाडीच्या कालावधीत राज्य तिसऱ्या क्रमांकावर घसरले होते. आम्ही सत्तेवर येताच सहा महिन्यात महाराष्ट्राला पहिला क्रमांक मिळवून दिला. विकासाची घोडदौड सुरू आहे.’

……………………..

विरोधकांचा रडीचा डाव

विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला. मात्र विरोधक ईव्हीएमवरुन सध्या रडीचा डाव खेळत आहेत. विजय मिळाला की ते ईव्हीएमचा मुद्दा काढत नाहीत. मात्र हार झाली की ईव्हीएमवरुन रडीचा डाव करायचा हा कुठला प्रकार ? असा टोला मुख्यमंत्री शिंदे याीनी हाणला.

……………………….

दिल्लीत गुरुवारी बैठक

महाराष्ट्रातील सत्तास्थापना, मंत्रीपदाची निश्चिती यासंबंधी दिल्ललीत २८ नोव्हेंबर रोजी गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये बेठक होत आहे. या बैठकीसाठी माझ्यासह देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes