विकासनिधीवरुन जनतेची फसवणूक नको, प्रशासकांनी वस्तुस्थिती स्पष्ट करावी –भारती पोवार
schedule07 Nov 25 person by visibility 14 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकार आणि महायुतीच्या मंत्री-खासदार-आमदारांच्याकडून कोल्हापूर शहराला शेकडो कोटीअइअकनकतथ्इकतथ्मअइ रुपयांचा निधी मंजूर करुन आणला, अशा वल्गना करत आहेत. इतका निधी मंजूर असेल तर शहरातील विविध विकास कामे का झाली नाहीत ? खरोखरच निधी आला की नुसत्याच घोषणा आहेत, लोकांना वस्तुस्थिती समजली पाहिजे. याकरिता महापालिका प्रशासनाने किती निधी आला, किती निधी खर्च झाला यासंबंधी सत्य काय ते सांगावे. विकासनिधीवरुन लोकांची फसवणूक नको’अशी मागणी माजी नगरसेविका भारती पोवार, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य अभिषेक मिठारी व मावळा ग्रुपचे उमेश पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.महायुती सरकारने केवळ निधीच्या आकडयांचा भुलभुलैय्या निर्माण करण्याऐवजी वास्तवता शहरासाठी किती निधी आणला, किती निधी खर्च केला हे जनतेला सांगावे. महापालिका प्रशासकांनी, कोणाच्याही दबावाला बळी न पडता विकासनिधीचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडावा.’असेही पत्रकार परिषदेत त्यांनी मागणी केली. आमदार सतेज पाटील यांना थेट पाइपलाइन योजनेचे श्रेय मिळू नये म्हणून काही जण खटाटोप करत आहेत. चंबुखडीपर्यंत पाणी आणण्याची जबाबदारी त्यांची होती. दरम्यान चंबुखडीतून शहरातील विविध भागांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिका नीटपणे काम करत नसेल तर आमदार पाटील यांना दोष कशासाठी द्यायचा ? असा सवाल पोवार यांनी केला.