Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सोमवारच्या संघर्ष मोर्चाने सरकारला धडकी भरेल, काँग्रेस कमिटीत पदाधिकारी - कार्यकर्त्यांचा निर्धारविजयाचा इतका उन्माद की मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांचाही अपमान, हसन मुश्रीफांचा सतेज पाटील यांच्यावर निशाणादिवाळीनंतर स्थायी समिती सभा, शेवटच्या आठवड्यात सर्वसाधारण सभा!सन्मानजनक निधी द्या, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठकगोकुळमध्ये कोणाचीही बॅकडोअर एंट्री होणार नाही, तज्ज्ञ व्यक्तीच संचालक होतीलगोकुळवर कब्जा करण्यासाठी महायुती सरकारचे षडयंत्र, नऊ नोव्हेंबरला कोल्हापूरात संघर्ष मोर्चा -आमदार सतेज पाटीलशिक्षणाधिकारी मीना शेंडकर निलंबित, शालेय शिक्षण क्रीडा विभागची कारवाईप्राचार्य जी.पी. माळी यांच्या काट्यावरची फुलं या आत्मकथनाचा बारा नोव्हेंबरला प्रकाशन समारंभ आमदार कौस्तुभ गावडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! जुनी पेन्शन योजना -सेवा ज्येष्ठतेच्या प्रश्नाकडे  वेधले लक्ष ! !सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट -सेट आवश्यक

जाहिरात

 

विजयाचा इतका उन्माद की मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांचाही अपमान, हसन मुश्रीफांचा सतेज पाटील यांच्यावर निशाणा

schedule06 Nov 26 person by visibility 15 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -:  ‘राजकारणात विजय आणि पराजय हे होत असतात. परंतु;  विजयाचा उन्माद नको पाहिजे आणि पराजयाने खचून जाणेही नको पाहिजे. विजयाचा इतका उन्माद की मुख्यमंत्र्यांचा अपमान, आमचा अपमान हे असं क्वचितच आम्ही पाहिलेलं आहे.’असा टोला राष्ट्रवादीचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांना लगाविला. ‘सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तर महायुती सहकार्य करेल काय,ती वेळ आता निघून गेलेली आहे. हा प्रयत्न त्यांनी याआधीच करायला हवा होता.’असे ही मुश्रीफ म्हणाले.

मंत्री मुश्रीफ हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलतप होते.ऊस दरावर निघालेल्या तोडग्याबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. गुरुवारी, चर्चेतून, समन्वयाने आणि संवादातून हा तोडगा निघाला.  या तोडग्याबद्दल मी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, इतर सर्व शेतकरी संघटनांचे प्रमुख नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मनापासून आभारी आहे.

 गोकुळ दूध संघ हा देशभरातील आणि राज्यभरातील नेत्यांपर्यंत जाण्याचा हा विषय नाही. परंतु; सतेज पाटील यांनी फेक सोशल मीडियाच्या माध्यमातून गवगवा करून तो विषय सर्वदूर पोहोचवलेला आहे, ते यामध्ये वाकबगार आहेत. गोकुळ दूध संघाच्या कोरमचा विषय कोणी समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही.गोकुळला समविचारीचे १३ संचालक निवडून आले आहेत, तर महायुतीचे १२ संचालक निवडून आले आहेत. बायलॉजप्रमाणे कोरम हा १४ संख्येचा आहे. कोरम झाल्याशिवाय मीटिंग होत नाही आणि मीटिंग झाल्याशिवाय चेअरमन निवड होत नाही. आम्ही त्यांची चेअरमन निवडीसाठी कोणत्याही प्रकारची अडवणूक केलेली नाही. त्यांनी जावं, त्यांनी कोरम पूर्ण करावा, त्यांनी अध्यक्ष निवड करावी, यासाठी आम्ही कोणतीही आडकाठी आणलेली नाही. कोरममुळे तयार झालेला डेडलॉक संपवण्यासाठीच सरकारने हा कायदा आणलेला आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. 
​   काँग्रेसचे आमदार सतेज पाटील 'दोस्तीत गद्दारी झाली' म्हणत असल्याकडे लक्ष वेधले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, गद्दारी कुठे झाली? आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीत गेलो, ते काँग्रेसमध्ये राहिले. मैत्री हा भाग वेगळा आहे.’असे मंत्री मुश्रीफ म्हणाले.
         

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes