Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सोमवारच्या संघर्ष मोर्चाने सरकारला धडकी भरेल, काँग्रेस कमिटीत पदाधिकारी - कार्यकर्त्यांचा निर्धारजज डडदिवाळीनंतर स्थायी समिती सभा, शेवटच्या आठवड्यात सर्वसाधारण सभा!सन्मानजनक निधी द्या, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठकगोकुळमध्ये कोणाचीही बॅकडोअर एंट्री होणार नाही, तज्ज्ञ व्यक्तीच संचालक होतीलगोकुळवर कब्जा करण्यासाठी महायुती सरकारचे षडयंत्र, नऊ नोव्हेंबरला कोल्हापूरात संघर्ष मोर्चा -आमदार सतेज पाटीलशिक्षणाधिकारी मीना शेंडकर निलंबित, शालेय शिक्षण क्रीडा विभागची कारवाईप्राचार्य जी.पी. माळी यांच्या काट्यावरची फुलं या आत्मकथनाचा बारा नोव्हेंबरला प्रकाशन समारंभ आमदार कौस्तुभ गावडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! जुनी पेन्शन योजना -सेवा ज्येष्ठतेच्या प्रश्नाकडे  वेधले लक्ष ! !सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट -सेट आवश्यक

जाहिरात

 

सोमवारच्या संघर्ष मोर्चाने सरकारला धडकी भरेल, काँग्रेस कमिटीत पदाधिकारी - कार्यकर्त्यांचा निर्धार

schedule06 Nov 26 person by visibility 6 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळच्या सत्तासंघर्षाची धग आता थेट रस्त्यावर पोहोचणार असून, राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आमदार सतेज पाटील यांनी संघर्ष मोर्चाची हाक दिली आहे. येत्या ९ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते लोकशाहीच्या रक्षणासाठी सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या नियोजनासाठी कोल्हापूर काँग्रेस कमिटी कार्यालयात समविचारी पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी झाली.

बैठकीत महायुतीवर गोकुळची सत्ता बळकावण्यासाठी कुटील राजकारण केल्याचा आरोप करण्यात आला. मोर्चात कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोल्हापुरचा स्वाभिमान आणि ताकद दाखवून देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. हुकूमशाही मोडून काढून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सरकारला धडकी भरवणारा मोर्चा काढू, असा आक्रमक इशारा महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी दिला.  याप्रसंगी नगरसेवक सुनील मोदी, आनंद माने, सरला पाटील यांनी भाषण केली.

 काँग्रेसचे करवीर तालुकाध्यक्ष राम पाटील यांनी प्रास्ताविक केले. बैठकीत जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, संग्राम पाटील, गोकुळचे माजी संचालक प्रकाश पाटील, नगरसेवक सुनील मोदी, दुर्वास कदम, आनंद माने, सरलाताई पाटील, अमर पाटील, माजी नगरसेवक धनंजय सावंत आदींनी आपली भूमिका मांडली. बैठकीला महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक मधुकर रामाने, नगरसेविका ऋग्वेदा माने, दीपाली घाटगे, केडीसीसी बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे, युवराज गवळी, एम. आर. पाटील, बाळासाहेब सरनाईक, रणवीर मोरे, भरत रसाळे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes