Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्राचार्य जी.पी. माळी यांच्या 'काट्यावरची फुलं' या आत्मकथनाचा बारा नोव्हेंबरला प्रकाशन समारंभ आमदार कौस्तुभ गावडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! जुनी पेन्शन योजना -सेवा ज्येष्ठतेच्या प्रश्नाकडे  वेधले लक्ष ! !सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट -सेट आवश्यक करवीर शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभपुणे-बेंगलोर महामार्गावर ३२ तासांपासून स्वाभिमानीचा एल्गार, किणी टोल नाक्यावर हजारो शेतकऱ्यांचा ठिय्यास्मॅकच्या अध्यक्षपदी भरत जाधव, उपाध्यक्षपदी प्रशांत शेळकेगोकुळमध्ये बहुमत समविचारी आघाडीलाच, अध्यक्ष निवडीत घोळ घातल्यास रस्त्यावर उतरून लढाई करूगोकुळमध्ये शासन नियुक्त चार संचालक वाढणार, मतदानाचा अधिकार मिळणार ! मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसतेज पाटलांची गोकुळबद्दलची भावना लोकशाहीसाठी कमी अन स्वतःच्या राजकीय सुलभतेसाठी अधिक- महायुतीचा टोला शासन नियुक्त संचालक संख्येवरून सतेज पाटलांचा हल्लाबोल, गोकुळमध्ये कौल आमच्याच बाजूने

जाहिरात

 

आमदार कौस्तुभ गावडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! जुनी पेन्शन योजना -सेवा ज्येष्ठतेच्या प्रश्नाकडे  वेधले लक्ष ! !

schedule05 Nov 26 person by visibility 43 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शिक्षक आमदार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी  सरकार दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह सेवा ज्येष्ठतेसंदर्भातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी त्यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. या भेटीदरम्यान शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नांचे गांभीर्य मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्या. जुनी पेन्शन योजना, सेवा ज्येष्ठतेतील अडचणी आणि कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी निगडित विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याची आग्रही मागणी आमदार गावडे यांनी केली. यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि मुख्याध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष  सचिन नलवडे उपस्थित होते.

………….

‘ शिक्षकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आणि शिक्षण क्षेत्रातील घटकांना सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून, न्याय्य मागण्यांना निर्णयाची जोड मिळेपर्यंत हा लढा सातत्याने सुरू राहील.’

  • कौस्तुभ गावडे, शिक्षक आमदार, पुणे विभागीय मतदारसंघ

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes