लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुलभ करा
schedule09 Jul 24 person by visibility 502 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना दिले.
आमदार पाटील यांनी याबाबत या योजनेचे नोडल अधिकारी सुहास वाईंगडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. ही योजना जास्तीत जास्त लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवण्याया योजनेचे फॉर्म भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, मदतनीस, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत यांच्याकडे आहे. मात्र या सर्वांना ऑनलाईन फॉर्म भरण्याबाबत पुरेशी तांत्रिक माहिती नसल्याने त्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात यावे. या योजनेसाठी आवश्यक तांत्रिक बाबीमध्ये योग्य सुधारणा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.साठी आमचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. प्रशासनाने यासाठी सहकार्य करावे असे म्हटले आहे.