Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सदाशिव येजरेंच्याकडून दोन्ही पदाचा कार्यभार काढला ! नव्या अधिकाऱ्यांच्याकडे कार्यभार !!केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात केंद्रीय विद्यालय -खासदार धनंजय महाडिकटेक्नोलॉजिया स्पर्धेत डीवाय पाटील इंजिनीअरिंग कॉलेज अव्वल ! न्यू कॉलेजला उपविजेतेपद !!महात्मा बसवण्णा : जीवन आणि संघर्ष ग्रंथाचे रविवारी प्रकाशनप्रा. जगन कराडे यांचा रविवारी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारघाटगे ग्रुपतर्फे वसंतराव घाटगेंची जयंती उत्साहात, कंपन्यांतील अधिकारी- कर्मचाऱ्यांचा गौरव !उद्धव ठाकरे जूनच्या पहिल्या आठवडयात कोल्हापुरात ! निर्धार मेळाव्यात मार्गदर्शन करणार !!बाहेरून येणाऱ्यांचे स्वागतच… पण महायुती पूर्वीपासूनच सक्षम: आमदार राजेश क्षीरसागरमहापालिका निवडणुकीसंबंधी भाजपाची पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठकशक्तीपीठ महामार्गविरोधात आता राज्यव्यापी आंदोलन, बांदा ते वर्धा निघणार संघर्ष यात्रा !

जाहिरात

 

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात केंद्रीय विद्यालय -खासदार धनंजय महाडिक

schedule09 May 25 person by visibility 172 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी आवश्यक अ केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न येत्या वर्षभरात मार्गी लागेल, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन जागा सुचवल्या आहेत. केंद्रीय समितीच्या पाहणी आणि मान्यतेनंतर केंद्रीय विद्यालयाचे काम लवकरच मार्गी लागेल, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह खाते प्रमुखांच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसाच्या कृती कार्यक्रमांमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात दुसर्‍या क्रमांकावर आल्याबद्दल खासदार महाडिक यांनी जिल्हाधिकारी येडगे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यानंतर झालेल्या आढावा बैठकीत कोल्हापुरातील केंद्रीय विद्यालय, कोल्हापुरी चप्पल क्लस्टर योजना, विमानतळ विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण, वन विभागाच्या जमिनीतून जाणारे रस्ते या प्रमुख विषयांवर सुमारे एक तास सविस्तर चर्चा झाली. बैठकीनंतर बोलताना खासदार महाडिक म्हणाले, ‘सध्या केवळ पुणे आणि बेळगाव येथेच केंद्रीय विद्यालय आहे. त्या पाठोपाठ कोल्हापुरातही केंद्रीय विद्यालय होण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांना यश आले. सरकारने, त्याला मान्यता दिली आहे.’

 कोल्हापुरी चप्पलही कोल्हापूरची खासियत आहे. या चपलेला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी क्लस्टर योजनाही अंमलात येत आहे. केंद्र सरकारने चर्मउद्योगाच्या वाढीसाठी १०० कोटी रुपयांची मेगा क्लस्टर योजना जाहीर केलीय. याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरी चप्पलच्या क्लस्टर योजनेला गती देण्याचे आपले प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती खासदार  महाडिक यांनी दिली. जिल्ह्याच्या दुर्गम डोंगरी तालुक्यातून वन विभागाच्या हद्दीतून ६ रस्ते गेले आहेत. हे रस्ते नागरिकांच्या वापरात येण्यासाठी पीडब्ल्यूडी, वन विभाग, आणि जिल्हा प्रशासन यांच्यासोबत बैठक घेवून हा प्रश्न मार्गी लावू, असे खासदार महाडिक यांनी नमूद केले. यावेळी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक अनिल शिंदे, जिल्हा परिषदेच्या प्रकल्प अधिकारी सुषमा देसाई, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes