आंतरविभागीय वेटलिफ्टींग स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा महिला संघ रवाना
schedule24 Nov 24 person by visibility 70 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आचार्य नागार्जुन विद्यापीठ नागार्जुननगर येथे २६ ते २८ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत होणाऱ्या दक्षिण-पश्चिम आंतर विभागीय वेटलिफ्टींग स्पर्धेकरिता शिवाजी विद्यापीठ महिला संघ रवाना झाला. संघामध्ये विविध महाविद्यालयातून 10 महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
संघात साक्षी सांडुगडे –कोल्हापूर, सरिता सावंत – कोल्हापूर, निकिता कमलाकर –कुरुंदवाड, भुमिका मोहिते- अर्जुननगर, काजल सरगर –सांगली, राजनंदिनी आमने- इचलकरंजी, राजलक्ष्मी पोवार –इचलकरंजी, स्नेहा आमने –इचलकरंजी, प्राजक्ता साळुंखे –सातारा, अपेक्षा ढोणे –सातारा यांचा समावेश आहे.
संघाचे संघव्यवस्थापक म्हणून डॉ.रवींद्र चव्हाण - देवचद कॉलेज अर्जुननगर तर प्रशिक्षक म्हणून डॉ.प्रशांत पाटील- शहाजी कॉलेज कोल्हापूर हे काम पाहणार आहेत. संघाला कुलगुरू डॉ. डि. टि.शिर्के.,प्र कुलगुरू डॉ. पी.एस.पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.शरद बनसोडे,डॉ. सुचय खोपडे यांचे प्रोत्साहन लाभले आहे.