जोतिबा यात्रेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे औषधांचे मोफत वाटप
schedule18 Apr 25 person by visibility 35 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. तीन दिवसांच्या शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. दक्षिण दरवाजा आणि काळभैरव मंदिर येथे शिबिर पार पडले.
शिबिराचे उद्घाटन माजी आमदार सुजित मिणचेकर, उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या हस्ते झाले. चैत्र यात्रेनिमित्त लाखो भाविक शेकडो किलोमीटर जोतिबा डोंगरावर चालत येतात. चालत येताना अनेक भाविकांना पाय दुखी, ठेच लागणे, पायाला जखमा, अशक्तपणा, अंगदुखी, ताप अशा अनेक समस्या भेडसावतात. त्यामुळे अशा भाविकांसाठी हे आरोग्य शिबिर एक वरदान ठरले.
आरोग्य शिबिर जिल्हाप्रमुख विनायक जरांडे, उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, शहरप्रमुख मोहन खोत, गगनबावडा तालुकाप्रमुख ओंकार पाटील, उपशहर प्रमुख विनायक जाधव, निलेश सुतार यांच्या विशेष प्रयत्नातून पार पडले. यावेळी महिला जिल्हाप्रमुख धनश्री देसाई, कागल तालुकाप्रमुख फरीन मकुभाई, करवीर तालुका उपप्रमुख राजेंद्र आळवेकर, केदार शिंदे, वैष्णवी चव्हाण, डॉ. आनंद चौगुले, अमित रननवरे, जिल्हा समन्वयक सुनील कानूरकर आदी उपस्थित होते.