राजर्षी शाहूंचे परिवर्तनवादी विचार नेपाळमधील समाजिक संस्थेत रुजवा- युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
schedule19 Apr 25 person by visibility 33 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘राजर्षी शाहू महाराज यांचे परिवर्तनवादी विचार नेपाळमधील सामाजिक संस्थेत रुजवा.’असे आवाहन युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले. येथील सायबर कॉलेज आणि नेपाळमधील कादंबरी मेमोरियल कॉलेजशी सामंजस्य करार झालेला आहे. या अंतर्गत या कॉलेजमधील २२ विद्यार्थी व दोन प्राध्यापिका सध्या कोल्हापूर जिल्हयाच्या अभ्यास दौऱ्यावर आहेत. या अभ्यास दौऱ्यातंर्गत त्यांनी, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी संयोगितराजे छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाजिक कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. त्यांच्या या कार्यामुळे देशविदेशात कोल्हापूरचे नावलौकिक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नेपाळमधील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा विविध क्षेत्रांची माहिती जाणून घेतली. संयोगिताराजेंच्या हस्ते नेपाळमधील प्रा. प्रदीप्ता कादंबरी व कीपा मस्की यांचा शाल श्रीफळ व राजर्षी शाहूच्या कार्याविषयची पुस्तके देत सत्कार केला. सायबर कॉलेजचे डॉ. दीपक भोसले यांनी प्रास्ताविक केले. पूनम गायकवाड यांनी आभार मानले.