पूरग्रस्तांसाठी शाहू शिक्षक आघाडी सरसावली, लाखाचा निधी जमविला !
schedule08 Oct 25 person by visibility 256 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या अस्मानी संकटावर मात करण्यासाठी, त्यांचा चिखलात रुतलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी माजी आमदार संजय घाटगे व गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे यांच्या संकल्पनेतून "कागलकरांनो चला देवू मदतीचा हात… मराठवाड्याला" हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून निर्माण होणारा निधी हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजू व समस्येने ग्रासलेल्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत कागलमधील शाहू शिक्षक आघाडीने एक लाख रुपयांचा निधी जमविला आहे.
शाहू शिक्षक आघाडी ही संघटना विरहित आहे. शिक्षकांनी, शिक्षकांसाठी काम करण्याकरिता आघाडी प्रयत्नशील असते. मराठवाडयातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आघाडीने हात पुढे केला आहे. शिक्षक, सहायक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमामध्ये प्राथमिक शाळेतील शिक्षक बाळासाहेब निंबाळकर, सुनील पाटील, प्रकाश मगदूम, संजय दाभाडे, जयवंत पाटील, रवी भोई, प्रदीप बुधाळे, नेताजी कमळकर, बाळासो खामकर, बाळासाहेब तांबेकर, तुकाराम इंगवले, जितेंद्र कुंभार, रमेश कदम, रोहिणी लोकरे, वैशाली कोंडेकर, पी आर पाटील, हरिश्चंद्र साळोखे, ए एल कांबळे, अनिल डवरी, विठ्ठल पाटील, सतीश पाटील, के डी पाटील, विश्वनाथ चावरे, ग. ल. कुंभार, एम. आर. गुरव, सुरेश खोत, प्रकाश बाबुराव चौगुले, नामदेव चौगुले, हणमंत रामा कुंभार, संदीप पाटील, सुनिल चौगुले यांनी मदत केली आहे. कोणी एक हजार, कोणी १५०० रुपये तर कोणी दोन हजार रुपयांची मदत केली आहे. हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.