सावित्रीबाई फुले रुग्णालयात डोनेशनमधून वॉटर फिल्टरची सुविधा
schedule22 May 26 person by visibility 99 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील डायग्नोस्टिक बिल्डिंगमधील सर्जिकल विभाग, मेडिसीन विभाग तसेच प्रसूती बिल्डिंगमधील बाल विभाग येथे रुग्णांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी किरण खतकर व आसिफ कुडचिकर यांच्या सहयोगातून वॉटर फिल्टर बसविण्यात आले.या वॉटर फिल्टरचे उद्घाटन काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक विनायक फाळके, अमर समर्थ, प्रविण सोनवणे, प्रशांत खेडकर, सचिन शेंडे, माजी नगरसेवक संभाजी देवणे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा उपस्थित होते. डोनेशन स्वरूपात उपलब्ध झालेल्या या वॉटर फिल्टरमुळे रुग्णांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर झाली अशा शब्दांत प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. संजना बागडी यांनी आभार मानले.