Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सायलेज तंत्रज्ञानामुळे दुग्ध व्यवसायाला चालना, गोकुळमध्ये नेदरलँडच्या तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शनरोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूरतर्फे शॉपिंग - फूड एक्स्पोमी कृतज्ञ, प्रकुलगुरुपदाच्या कालावधीत खूप काही शिकता आले - डॉ. ज्योती जाधव परप्रांतियांची वैयक्तिक माहिती संकलित करा, आरपीआय गवई गटाची मागणीजिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला प्रारंभपत्रकार विजय चोरमारे यांना भाई माधवराव बागल पुरस्कार, २८ मे रोजी वितरण समारंभडॉ. आर. के. कामत शिवाजी विद्यापीठाचे नवीन कुलगुरू शहरातील विद्युत दिव्यांचा विषय अंधातरीच…ईईएसएल कंपनीसोबतचा करार महापालिकेकडून रद्द, नवीन कंपनीचा प्रस्ताव सभागृहाने फेटाळलाशिक्षकेतर कर्मचारी समायोजन  विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणार : राजेंद्र कोरे प्रा. श्रुती जोशी यांची इचलकरंजीत प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती

जाहिरात

 

रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूरतर्फे शॉपिंग - फूड एक्स्पो

schedule22 May 26 person by visibility 26 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूरतर्फे महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी शॉपिंग आणि फूड एक्स्पो आयोजित केले आहे. हा शॉपिंग अँड फूड एक्स्पो २३ व २४ मे  २०२६ या कालावधीत मांगल्य हॉल, जीएसटी ऑफिस रोड,ताराबाई पार्क येथे सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत असणार आहे अशी माहिती क्लबचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी दिली.
    या प्रदर्शनात इंटिरियर डेकोरेशन, सिल्क, माहेश्वरी आणि कॉटन साड्या, आकर्षक ज्वेलरी, कुर्त्या, विविध प्रकारची फुलझाडे, हाऊसहोल्ड इक्विपमेंट, टूर पॅकेजेस अशा वैविध्यपूर्ण अश्या ५० हुन अधिक स्टॉल्सची रेलचेल असणार आहे. तसेच व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ, मोमोज, ज्यूस, बर्गर, स्प्रिंग पोटॅटो, बिर्याणी अशा विविध चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची खास संधी उपलब्ध होणार आहे.      प्रदर्शनास भेट देणाऱ्या पहिल्या दोनशे ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. लहान मुलांसाठी गेम झोन असणार आहे. त्यामुळे खरेदीसोबतच आनंददायी खाद्यजत्रेचा अनुभव घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी या शॉपिंग अँड फूड एक्स्पोला आवर्जून भेट दिली असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कुटुंबासह प्रदर्शनास भेट देऊन खरेदीचा आणि स्वादिष्ट पदार्थांचा मनसोक्त आनंद घ्यावा असे आवाहन केले आहे. पत्रकार परिषदेला विनायक भालेकर, राजेंद्र जोशी, प्रोजेक्ट हेड वनिता ढवळे, सोनल जोशी आणि स्नेहा भालेकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes