राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पुन्हा ताकतीने उभा करणार - शशिकांत शिंदे
schedule23 May 26 person by visibility 21 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : "राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पुन्हा ताकतीने उभा करणार -" असे ग्वाही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
शिंदे यांनी शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील व शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक राजर्षी शाहू सभागृह सर्किट हाऊस कोल्हापूर या ठिकाणी घेतली. दीड तास कार्यकर्त्यांची मनोगते ऐकून घेतल्यानंतर बोलत असताना कार्यकर्त्यांच्या मताशी मी सहमत आहे. मध्यंतरी पक्ष एकत्रित करण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही चर्चा थांबली. आता कोणाबरोबर ही चर्चा न करता शरद पवार पक्ष मोठा करणे यावर लक्ष केंद्रित केले असून महाराष्ट्राचा दौरा मी सुरू केला आहे. मुंबईच्या बैठकीमध्ये विलीनीकरणावर पूर्णविराम देण्यात आला आहे. त्यामुळे सरकार विरोधात छोटी मोठे आंदोलने करून पक्षाची प्रतिमा पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. विलीनीकरणामुळे आलेली मरगळ झटकून आता कामाला लागावे. प्रत्येकाला त्याच्या कामाचे श्रेय दिले जाईल जे काम करणार नाहीत नुसते पदासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला केले जाईल असेही सांगितले. जास्तीत जास्त मतदारसंघांमध्ये बी एल ओ यांची नियुक्ती करा महाविकास आघाडी सन्मानाची वागणूक देईल याची दक्षता घेतली जाईल. पक्षाच्या वतीने सुद्धा आंदोलन केले जातील व महाविकास आघाडी म्हणून सुद्धा एकत्रित आंदोलन केली जातील त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हा शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातून प्रचंड विरोध आहे. नऊ तारखेच्या महामोर्चाला मी स्वतः कोल्हापूरमध्ये उपस्थित राहणार आहे असेही त्यांनी सांगितले. शहर जनरल सेक्रेटरी गणेश जाधव यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे, रामराजे कुपेकर, अमर चव्हाण यांच्यासह शहरातील व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी म्हणणे मांडले. व्यासपीठावर माजी आमदार राजीव आवळे, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने महिला, शहराध्यक्ष पद्मा तिवले, युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, मदन कारंडे, विनय कदम, संतोष मेघाणे उपस्थित होते. राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी आभार मानले.