Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिका शाळा ठरल्या जिल्ह्यात अव्वलदुग्धजन्य पदार्थांच्या मूल्यवर्धनासंबंधी संशोधन, डॉ. ज्ञानेश्वर पंतगे यांच्या संशोधनाला पेटंटमहाराष्ट्र न्यूज वनवर शुभेच्छांचा वर्षाव, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून दिवसभर सदिच्छा !भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन करवीर तालुकाध्यक्षपदी मन्सूर सय्यदबदलत्या मानसिकतेची नवी पहाट, उच्चशिक्षित इंजिनीअर मुलीने केले शेतकरी मुलासोबत लग्न !!यशस्वितेचा षटकार ! महाराष्ट्र न्यूज वनचे सातव्या वर्षात पदार्पण ! !सहकार गौरव पुरस्कार सोहळा; आमदार विनय कोरे यांना सहकार भूषण पुरस्कार ! विद्याधर अनास्कर ठरले सहकार महर्षी !!ब्राह्मण समाजाला सरकारकडून घोषणांची नव्हे, उत्तरदायित्वाची गरज ! गोलमेज परिषदेत राज्यव्यापी कृती समितीची स्थापना ! !न्यू कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी प्रवेशासाठी अधिकृत सुविधा केंद्रफार्मसीच्या विद्यार्थ्याला 38 लाखाचे पॅकेज, संजय घोडावतनी केले अभिनंदन

जाहिरात

 

शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिका शाळा ठरल्या जिल्ह्यात अव्वल

schedule06 Jul 26 person by visibility 23 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन  : महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीमार्फत महानगरपालिका शाळांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) मध्ये ऐतिहासिक यश मिळवले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात महानगरपालिका शाळेतील २५ मुले राज्य गुणवत्ता यादीत तर ८७ मुले जिल्हा गुणवत्ता यादीत चमकून कोल्हापूरचे नाव उज्ज्वल केले आहे.

लक्ष्मीबाई जरग विद्यालयातील राज्य राज्य गुणवत्तेत पंधरा,  जिल्हा गुणवत्तेत ४२, नेहरूनगर विद्यामंदिरमधील राज्य गुणवत्तेत पाच जिल्हा गुणवत्तेत दहा, प्रिन्स शिवाजी विद्यालय जाधववाडी राज्य गुणवत्तेत दोन, जिल्हा गुणवत्तेत अकरा, टेंबलाईवाडी विद्यामंदिरमधील राज्य गुणवत्तेत दोन व जिल्हा गुणवत्तेत नऊ, पीएम श्री.महात्मा फुले विद्यालयमधील जिल्हा गुणवत्तेत नऊ, राजर्षी शाहू विद्यालय बावडामधील राज्य गुणवत्तेत एक, ज्योतिर्लिंग विद्यामंदिरमधील जिल्हा गुणवत्तेत तीन व रावबहाद्दुर विचारे विद्यालयमधील जिल्हा गुणवत्तेत तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

      महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी प्राथमिक शिक्षण समितीच्यावतीने इयत्ता पहिलीपासूनच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी पहिली व दुसरीसाठी 'कोल्हापूर टॅलेंट सर्च', तिसरी व सहावीसाठी 'प्रज्ञाशोध परीक्षा', तर चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'स्कॉलरशिप सराव परीक्षा' नियमितपणे घेतल्या जातात. विशेष म्हणजे, अंतिम परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासना इतकीच शिष्यवृत्ती महानगरपालिकेकडूनही दिली जाते. अशी शिष्यवृत्ती देणारी कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे. याशिवाय, चौथी  स्कॉलरशिप परीक्षेतील राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या भाग्यवान विद्यार्थ्यांना थेट विमानाने 'इस्रो'  अभ्यास दौऱ्यासाठी पाठवले जाते. दौऱ्याचा खर्च महानगरपालिका स्वतः करते. या यशाबद्दल महापौर रुपाराणी निकम, आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, प्रशासनाधिकारी जयश्री जाधव यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. शाळांना, प्राथमिक शिक्षण समितीकडील कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, परीक्षा विभागाकडील संजय शिंदे यांचे सहकार्य लाभले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes